सोलापूर – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वतीने रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूर स्टेशन यार्ड मर्यादेत किमी ४५४/४-५ येथे रेल्वे ओव्हर ब्रिज सुपर स्ट्रक्चर आणि सब स्ट्रक्चरच्या जुन्या संरचनेचे पाडकामासाठी विशेष रेल्वे वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळात होणार बदल आणि त्याचा सविस्तर माहिती देण्यात आली आहे. रविवार १४ डिसेंबर २०२५ सकाळी ०८:३० ते संध्याकाळी ०७:३० ११ तास ब्लॉकची वेळ असणार आहे.
१४ डिसेंबर रोजी होसपेटे-सोलापूर एक्सप्रेस, सोलापूर-पुणे एक्सप्रेस, सोलापूर-होसपेटे एक्सप्रेस, वाडी-सोलापूर डेमू, सोलापूर-दौंड डेमू स्पेशल, हडपसर-सोलापूर डेमू, दौंड-कलबुरगि डेमू स्पेशल, सोलापूर-कलबुरगि डेमू, कलबुरगि-दौंड विशेष या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
म्हैसूर-पंढरपूर गोलगुंबज एक्सप्रेस हि दि. १३ डिसेंबर रोजी, हुब्बळ्ळि-लोंडा-मिरज-पंढरपूर मार्गे वळवण्यात येईल. पंढरपूर-म्हैसूर गोलगुंबज एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी पंढरपूर-मिरज-लोंडा-हुब्बळ्ळि मार्गे वळवण्यात येईल. विजयपुरा-रायचूर पॅसेंजर हि दि. १४ डिसेंबर रोजी विजयपुरा-होटगी-वाडी मार्गे वळवली जाईल (होटगी-सोलापूर-होटगी सेवा बंद). रायचूर-विजयपुरा पॅसेंजर हि दि. १४ डिसेंबर रोजी वाडी-होटगी-विजयपुरा मार्गे वळवली जाईल (होटगी-सोलापूर-होटगी सेवा बंद). तिरुवनंतपुरम सेंट्रल-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस हि दि. १३ डिसेंबर रोजी गुंतकल-बल्लारी-होसपेटे -गदग-हुबळी-लोंडा-मिरज-पुणे मार्गे वळवण्यात येईल. बेंगळुरू-सीएसएमटी मुंबई उद्यान एक्सप्रेस हि दि. १३ डिसेंबर रोजी गुंतकल-बल्लारी-होसपेटे-गदग-हुबळी-लोंडा-मिरज-पुणे मार्गे वळवण्यात येईल. सीएसएमटी मुंबई-बेंगळुरू उद्यान एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी पुणे-मिरज-लोंडा-हुबळी-गदग-होसपेटे-बल्लारी-गुंटकल मार्गे वळवण्यात येईल. एलटीटी मुंबई-विशाखापट्टणम एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी कुर्डुवाडी-लातूर-लातूर रोड-खानापूर-विकराबाद मार्गे वळवली जाईल. पुणे-हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी कुर्डुवाडी-लातूर-लातूर रोड-बीदर-विकराबाद मार्गे वळवली जाईल.
सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी कुर्डुवाडी येथून सुटेल. सोलापूर-हसन एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी कलबुरगि येथून सुटेल. बागलकोट-म्हैसूर बसवा एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी तिच्या निर्धारित वेळेच्या ३० मिनिटांनी पूर्ववत नियंत्रित केले जातील. सोमवार १५ डिसेंबर २०२५ सकाळी ११:१० ते दुपारी १:४० २ तास ३० मिनिटे ब्लॉक करण्यात येईल. १५ डिसेंबर रोजी सोलापूर-होसपेटे एक्सप्रेस, होसपेटे-सोलापूर एक्सप्रेस, सोलापूर-पुणे एक्सप्रेस या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
१५ डिसेंबर रोजी ३० मिनिटांनी नियंत्रित केल्या जातील. रायचूर-विजयपुरा पॅसेंजर, विजयपुरा-रायचूर पॅसेंजर, पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस, १२१७० सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, चेन्नई सेंट्रल-अहमदाबाद एक्सप्रेस ९० मिनिटांनी नियंत्रित केल्या जातील. या सर्व गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
मंगळवार आणि बुधवार १६ आणि १७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ०२:१० ते संध्याकाळी ०५:४० (३ तास ३० मिनिटे) ब्लॉक करण्यात येईल. कन्याकुमारी-पुणे एक्सप्रेस दि. १६ व १७ डिसेंबर रोजी ३० मिनिटांनी नियंत्रित होईल.
गुरुवार आणि शुक्रवार १८ आणि १९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०४:०० ते सायंकाळी ०७:३० (३ तास ३० मिनिटे) ब्लॉक करण्यात येईल. सोलापूर-हसन एक्सप्रेस २० मिनिटांनी नियंत्रित केली जाईल. बागलकोट-म्हैसूर बसवा एक्सप्रेस ४० मिनिटांनी नियंत्रित केली जाईल.
या रेल्वे गाड्या शॉर्ट टर्मिनेशन धावतील
पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी कुर्डुवाडी पर्यंत धावेल तर हसन-सोलापूर एक्सप्रेस हि दि. १३ डिसेंबर रोजी कलबुरगि पर्यंत धावेल
१६ आणि १७ डिसेंबर रोजी वळवल्या जातील
विजयपुरा-रायचूर पॅसेंजर हि दि. १६ व १७ डिसेंबर रोजी विजयपुरा-होटगी-वाडी मार्गे वळवली जाईल (होटगी-सोलापूर-होटगी सेवा बंद). रायचूर-विजयपुरा पॅसेंजर हि दि. १६ व १७ डिसेंबर रोजी वाडी-होटगी-विजयपुरा मार्गे वळवली जाईल (होटगी-सोलापूर-होटगी सेवा बंद)
या रेल्वे गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल
कन्याकुमारी-पुणे एक्सप्रेस हि दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी कन्याकुमारी येथून सकाळी ०८:४० ऐवजी २ तासांनी १०:४० वाजता सुटेल. पुणे-कन्याकुमारी एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी पुण्याहून रात्री ११:४५ ऐवजी १ तासाने ००:४५ वाजता सुटेल. भुवनेश्वर-सीएसएमटी मुंबई कोणार्क एक्सप्रेस हि दि. १३ डिसेंबर रोजी भुवनेश्वरहून दुपारी ०२:४० ऐवजी २ तासांनी सायंकाळी ०४:४० वाजता सुटेल. सीएसएमटी मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी सीएसएमटी मुंबईहून दुपारी ०२:०० ऐवजी २ तासांनी सायंकाळी ०४:०० वाजता सुटेल. हैदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी हैदराबादहून दुपारी ०२:४० ऐवजी २ तासांनी सायंकाळी ०४:४० वाजता सुटेल.


























