Thursday, May 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

१४ डिसेंबरला ओव्हरब्रिजच्या पाडकामामुळे घेण्यात ११ तास ब्लॉक; १४ ते १९ डिसेंबर दरम्यान रेल्वे वाहतुकीवर होणारा परिणाम

तरुण भारतbyतरुण भारत
December 4, 2025
in railway
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वतीने रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूर स्टेशन यार्ड मर्यादेत किमी ४५४/४-५ येथे रेल्वे ओव्हर ब्रिज सुपर स्ट्रक्चर आणि सब स्ट्रक्चरच्या जुन्या संरचनेचे पाडकामासाठी विशेष रेल्वे वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळात होणार बदल आणि त्याचा सविस्तर माहिती देण्यात आली आहे. रविवार १४ डिसेंबर २०२५ सकाळी ०८:३० ते संध्याकाळी ०७:३० ११ तास ब्लॉकची वेळ असणार आहे.

१४ डिसेंबर रोजी  होसपेटे-सोलापूर एक्सप्रेस, सोलापूर-पुणे एक्सप्रेस, सोलापूर-होसपेटे एक्सप्रेस, वाडी-सोलापूर डेमू, सोलापूर-दौंड डेमू स्पेशल, हडपसर-सोलापूर डेमू, दौंड-कलबुरगि डेमू स्पेशल, सोलापूर-कलबुरगि डेमू, कलबुरगि-दौंड विशेष या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

म्हैसूर-पंढरपूर गोलगुंबज एक्सप्रेस हि दि. १३ डिसेंबर रोजी, हुब्बळ्ळि-लोंडा-मिरज-पंढरपूर मार्गे वळवण्यात येईल. पंढरपूर-म्हैसूर गोलगुंबज एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी पंढरपूर-मिरज-लोंडा-हुब्बळ्ळि मार्गे वळवण्यात येईल. विजयपुरा-रायचूर पॅसेंजर हि दि. १४ डिसेंबर रोजी विजयपुरा-होटगी-वाडी मार्गे वळवली जाईल (होटगी-सोलापूर-होटगी सेवा बंद). रायचूर-विजयपुरा पॅसेंजर हि दि. १४ डिसेंबर रोजी वाडी-होटगी-विजयपुरा मार्गे वळवली जाईल (होटगी-सोलापूर-होटगी सेवा बंद). तिरुवनंतपुरम सेंट्रल-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस हि दि. १३ डिसेंबर रोजी गुंतकल-बल्लारी-होसपेटे -गदग-हुबळी-लोंडा-मिरज-पुणे मार्गे वळवण्यात येईल. बेंगळुरू-सीएसएमटी मुंबई उद्यान एक्सप्रेस हि दि. १३ डिसेंबर रोजी गुंतकल-बल्लारी-होसपेटे-गदग-हुबळी-लोंडा-मिरज-पुणे मार्गे वळवण्यात येईल. सीएसएमटी मुंबई-बेंगळुरू उद्यान एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी पुणे-मिरज-लोंडा-हुबळी-गदग-होसपेटे-बल्लारी-गुंटकल मार्गे वळवण्यात येईल. एलटीटी मुंबई-विशाखापट्टणम एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी कुर्डुवाडी-लातूर-लातूर रोड-खानापूर-विकराबाद मार्गे वळवली जाईल. पुणे-हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी कुर्डुवाडी-लातूर-लातूर रोड-बीदर-विकराबाद मार्गे वळवली जाईल.

सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर  रोजी कुर्डुवाडी येथून सुटेल. सोलापूर-हसन एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी कलबुरगि येथून सुटेल. बागलकोट-म्हैसूर बसवा एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी तिच्या निर्धारित वेळेच्या ३० मिनिटांनी पूर्ववत नियंत्रित केले जातील. सोमवार १५ डिसेंबर २०२५ सकाळी ११:१० ते दुपारी १:४० २ तास ३० मिनिटे ब्लॉक करण्यात येईल. १५ डिसेंबर रोजी सोलापूर-होसपेटे एक्सप्रेस, होसपेटे-सोलापूर एक्सप्रेस, सोलापूर-पुणे एक्सप्रेस या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

१५ डिसेंबर रोजी ३० मिनिटांनी नियंत्रित केल्या जातील. रायचूर-विजयपुरा पॅसेंजर, विजयपुरा-रायचूर पॅसेंजर, पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस, १२१७० सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, चेन्नई सेंट्रल-अहमदाबाद एक्सप्रेस ९० मिनिटांनी नियंत्रित केल्या जातील. या सर्व गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

मंगळवार आणि बुधवार १६ आणि १७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ०२:१० ते संध्याकाळी ०५:४० (३ तास ​​३० मिनिटे) ब्लॉक करण्यात येईल. कन्याकुमारी-पुणे एक्सप्रेस दि. १६ व १७ डिसेंबर रोजी ३० मिनिटांनी नियंत्रित होईल.

गुरुवार आणि शुक्रवार १८ आणि १९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०४:०० ते सायंकाळी ०७:३० (३ तास ​​३० मिनिटे) ब्लॉक करण्यात येईल. सोलापूर-हसन एक्सप्रेस २० मिनिटांनी नियंत्रित केली जाईल. बागलकोट-म्हैसूर बसवा एक्सप्रेस ४० मिनिटांनी नियंत्रित केली जाईल.


या रेल्वे गाड्या शॉर्ट टर्मिनेशन धावतील
पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर  रोजी कुर्डुवाडी पर्यंत धावेल तर हसन-सोलापूर एक्सप्रेस हि दि. १३ डिसेंबर रोजी कलबुरगि पर्यंत धावेल


१६ आणि १७ डिसेंबर रोजी वळवल्या जातील
विजयपुरा-रायचूर पॅसेंजर हि दि. १६  व १७ डिसेंबर रोजी विजयपुरा-होटगी-वाडी मार्गे वळवली जाईल (होटगी-सोलापूर-होटगी सेवा बंद). रायचूर-विजयपुरा पॅसेंजर हि दि. १६ व १७ डिसेंबर रोजी वाडी-होटगी-विजयपुरा मार्गे वळवली जाईल (होटगी-सोलापूर-होटगी सेवा बंद)


या रेल्वे गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल
कन्याकुमारी-पुणे एक्सप्रेस हि दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी कन्याकुमारी येथून सकाळी ०८:४० ऐवजी २ तासांनी १०:४० वाजता सुटेल. पुणे-कन्याकुमारी एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी पुण्याहून रात्री ११:४५ ऐवजी १ तासाने ००:४५ वाजता सुटेल. भुवनेश्वर-सीएसएमटी मुंबई कोणार्क एक्सप्रेस हि दि. १३ डिसेंबर रोजी भुवनेश्वरहून दुपारी ०२:४० ऐवजी २ तासांनी सायंकाळी ०४:४० वाजता सुटेल. सीएसएमटी मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी सीएसएमटी मुंबईहून दुपारी ०२:०० ऐवजी २ तासांनी सायंकाळी ०४:०० वाजता सुटेल. हैदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस हि दि. १४ डिसेंबर रोजी हैदराबादहून दुपारी ०२:४० ऐवजी २ तासांनी सायंकाळी ०४:४० वाजता सुटेल.

Post Views: 50
Previous Post

गटविकास अधिकार्‍यांचे आजपासून सामूहिक रजा आंदोलन

Next Post

लखनऊ येथे झालेल्या स्काऊट गाईड राष्ट्रीय जांबोरीमध्ये महाराष्ट्र विद्यालयाचा सहभाग

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

लखनऊ येथे झालेल्या स्काऊट गाईड राष्ट्रीय जांबोरीमध्ये महाराष्ट्र विद्यालयाचा सहभाग

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या ३० मे पासून सुरू होणाऱ्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जाणार

May 20, 2026
स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

May 20, 2026

शक्तीपीठ महामार्ग वेळापूर येथे समर्थनार्थ शेतकरी मेळावा

May 20, 2026

अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू; २१ मेपर्यंत पसंतीक्रम भरण्याची अंतिम मुदत

May 20, 2026

तीन महिन्यांपासून वेतन रखडले; दिव्यांग शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा आक्रोश

May 20, 2026

वृद्ध इसमाचा मृत्यू  – मजुराची गळफासाने आत्महत्या – औषध पिलेल्या इसमाचा मृत्यू

May 20, 2026

पाहणी पूर्ण, आता गुणांकनाची कसोटी; ‘समृद्ध पंचायतराज’मध्ये गावागावात उत्सुकता

May 20, 2026

अक्कलकोट तालुक्यात रानडुकराचा हैदोस – हल्ल्यात तीन शेतकरी जखमी 

May 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0873205

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697