सोलापूर : सोलापूर येथे नियोजित कार्यक्रमाच्या बैठकीच्या ठिकाणी वाघमारे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गुणगौरव उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा आण्णासाहेब बनसोडे साहेब यांनी केला.
वाघमारे नेहमीच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. त्याचबरोबर आपण समाजात राहत असताना समाजाप्रती नेहमीच विकास करण्याचा ध्येय उराशी बाळगून कार्य करत असतात. त्यामुळे शैक्षणिक व सामाजिक कार्याची गुणवत्ता लक्षात घेऊन मा.श्री आण्णासाहेब बनसोडे साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन कार्याचा गौरव केला.


























