Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिगंबरा, दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. या दत्त मंत्राचा साताऱ्यात जयघोष

तरुण भारतbyतरुण भारत
December 5, 2025
in marathwada
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा – दिगंबरा, दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. या दत्त मंत्राचा जयघोष करत सालाबाद प्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला श्री दत्तात्रेय जयंती उत्सव साजरा केला जातो

गुरुवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर हा दत्तजन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिरातून ..अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा..च्या जयघोषात साजरा करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात या दत्त जयंती सोहळ्या अगोदर सात दिवस दत्तात्रय भगवानाचे चरित्र अर्थात श्री गुरुचरित्र पठण पारायण स्वरूपात घरोघरी तसेच सामुदायिक रीतीने करण्याची प्रथा आहे

मागील शुक्रवारपासून या गुरुचरित्र वाचन पारायण सोहळ्यात सुरुवात झाली ,व आज या सप्ताहाची सांगता दत्तजन्माने करण्यात आली. सातारा शहरातील प्रतापगंज पेठेतील श्री मुतालिक दत्त मंदिरात यानिमित्त तीन दिवसांचा दत्तजन्म उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे .आज सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर 5 वाजून 59 मिनिटांनी दत्तजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिराला विविध आकर्षक फुलांची तसेच केळीचे आणि नारळाच्या पानांची सजावट करण्यात आली .

मंदिरातील संगमरवरी दत्तमूर्तीला अतिशय सुरेख असे गुलाब आणि शेवंती पुष्पांचे हार घालून फुलांची सजावट करण्यात आली होती. दिवसभर साबुदाणा खिचडी चा प्रसाद हातात वितरण करण्यात येत होता. भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.

या मंदिरात दत्त जयंती सोहळ्यानिमित्त बुधवारी सायंकाळी 11 ब्रह्मवृद्धांच्या उपस्थितीत मंत्र जागर करण्यात आला तसेच गुरुवारी सकाळी दत्त जयंती दिवशी सकाळी दत्त मूर्तीला विशेष पंचामृत स्नान, महाअभिषेक आणि पूजा संपन्न झाल्यावर मंदिरात ब्रह्मवृंदांनी दत्तयाग संपन्न केला .दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. सायंकाळी 5 पाच ते 7 या वेळेत वेदमूर्ती गोविंदशास्त्री जोशी यांचे जन्मकाळानिमित्त प्रवचन संपन्न झाले .आणि रात्री 8 ते 9 या वेळेत अरविंद कुलकर्णी यांची दत्त भक्तीगीते आणि अभंगवाणी हा सुश्राव्य गायन कार्यक्रम संपन्न झाला. शुक्रवारी सकाळी लघुरुदराने या दत्त जन्मोत्सव तीन दिवशीय सोहळ्याची सांगता होणार आहे अशी माहिती वेदमूर्ती मयूरशास्त्री मेढेकर व श्री .जोशी गुरुजी यांनी दिली .आज दिवसभर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आकर्षक विद्युत रोषणाई मुळे मंदिराला विशेष रूप प्राप्त झाले होते .मंदिराच्या पुढे आकर्षक सजावट आणि कमान स्वागतासाठी बांधण्यात आली होती.

सातारा शहरातील माची पेठेतील टोपे मामा दत्त मंदिर ,पोलीस केंद्र पुढील आनंदवाडी दत्त मंदिर तसेच संगमनगर आणि शहरातील विविध मंदिरात दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात सायंकाळी संपन्न झाला.

गेंडामाळ शाहूपुरी परिसरातील श्री दत्त भक्त मंडळाचे वतीने तीन दिवसांचा विविध कार्यक्रम आयोजित केला असून यामध्ये भजन ,प्रवचन, कीर्तन, दत्त जन्मकाळ साजरा करण्यात आला .सातारा जिल्हा नजीकच्या श्रीक्षेत्र नारायणपूर येथेही दत्तभक्तांनी एकमुखी दत्त मंदिरात हा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला .सातारा येथून खास दत्त जयंती निमित्त अक्कलकोट गाणगापूर, नरसोबाची वाडी ,नारायणपूर, श्रीक्षेत्र गोंदावले येथे विशेष एसटी बसेस भक्तांच्या सोयीसाठी सोडण्यात आल्या होत्या .

सायंकाळी दत्तजन्म सोहळा झाल्यावर महाआरती होऊन प्रसाद वितरण करण्यात आला .अनेक दत्त मंदिरात यानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते .सातारा जिल्ह्यातील विविध एसटी आगारात असलेल्या श्री दत्त मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती .तसेच अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी विशेष वर्गणी काढून येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते .

सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पुण्यतिथी महोत्सव शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे .यानिमित्त गोंदावले येथील दत्त मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील श्री ढाळे परिवाराच्या दत्त मंदिरातही मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती .भजन, कीर्तन, प्रवचन ,अखंड जागर आणि दत्तधुन तसेच दत्त स्मरण करणारी भावगीते भक्ती गीते म्हणत दत्तभक्तांनी हा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला.

=======================

फोटो ओळी ..दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्त मंत्राचा जयघोष करत सातारा जिल्ह्यात मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी होणारी दत्त जयंती अर्थात श्री भगवान दत्तात्रेय यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला .सातारा शहरातील प्रतापगंज पेठेतील श्री  मूतालिक दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळ्यानिमित्त तीन दिवसांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून जयंतीनिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिरातील दत्त मूर्तीला पहाटे महा अभिषेक करून फुलांच्या हारांनी सजवण्यात आले होते.

Post Views: 123
Previous Post

चिंचोलीतील कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार संधी मिळाव्यात

Next Post

वाघमारे नेहमीच शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर –  आण्णासाहेब बनसोडे 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वाघमारे नेहमीच शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर -  आण्णासाहेब बनसोडे 

ताज्या बातम्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

April 21, 2026

भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त पारंपारीक वाद्यासह मिरवणूक

April 21, 2026

मॉरिशस शांती परिषदेसाठी डॉ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

April 21, 2026

राजेश पवार यांची राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेश प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

April 21, 2026

प्रा. चरणसिंह कायटे यांचे दुहेरी यश

April 21, 2026

सोलापूर शहरात पावसाची हजेरी

April 21, 2026

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822546

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697