सोलापूर – दयानंद महाविद्यालयातील एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन भीमाशंकर व्हनमाने यांची दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी महाराष्ट्र कन्टीजंटचे मार्गदर्शक म्हणून निवड झाली आहे.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने भारतातून विविध राज्यांमधून १७ एन.सी.सी. डायरेक्टर्स दिल्लीच्या संचलनासाठी निवड होत असते. यंदा इंडियन आर्मी विंग, इंडियन नेव्ही विंग, इंडियन एअर फोर्स विंग मधून महाराष्ट्रातून १२४ एन.सी.सी.छात्र दिल्ली येथे होणाऱ्या २६ जानेवारीच्या परेड संचलनासाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र एन.सी.सी.कन्टीजंटने आतापर्यंत सलग तीन वेळा संचलनात प्रथम क्रमांकाचा विजय पटकाविला आहे. याही वर्षी महाराष्ट्र कन्टीजंट उत्तम कार्य करण्यासाठी दयानंद महाविद्यालयातील कॅप्टन भीमाशंकर व्हनमाने यांची पुणे एन.सी.सी.ग्रुप हेडकॉटरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अरविंद चौधरी, सोलापूरच्या ३८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सीचे कमांडिग ऑफिसर कर्नल एम.डी. मुत्तप्पा, अँडम ऑफिसर कर्नल देवानंद मठपती आदी अधिकारी वर्गानी निवड केली आहे.
या निवडीबद्दल दयानंद संस्थेचे स्थानिक सचिव डॉ. महेश चोप्रा, संस्थेचे प्रशासक डॉ.विजयकुमार उबाळे, प्राचार्य डॉ. बी.एच. दामजी,प्राचार्य डॉ. एस. बी. क्षिरसागर, प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, उपप्राचार्य अरुण खांडेकर, सर्व प्राध्यापक वृंदानी अभिनंदन केले आहे.























