सोलापूर- गोविंदश्री ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेने 75 पूर्ण केलेल्या सभासदांचा *अमृतमहोत्सव 2025* या कार्यक्रमांमध्ये पंढरीनाथ लुंगारे 81 वर्ष, अशोक तारापुरे 80 वर्ष, रमाकांत देशपांडे 79 वर्ष, प्रभाकर ढोबळे, 80 वर्ष, विजयसिंह बायस 79 वर्ष अशोक भोसले 76 वर्ष, विठ्ठल गरड 76 वर्ष, अशोक मराठे 76 वर्ष, मोहम्मद हुसेन शेख 75 वर्ष या ज्येष्ठांचा सन्मानचिन्ह, शाल, बुके देऊन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय साहित्यिक प्रा.डॉ राजेंद्र दास व सोलापूर महापालिका माजी स्थायी समिती सदस्य आदरणीय शिवलिंग कांबळे उर्फ शिवा बाटलीवाला यांचे शुभ हस्ते गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक पोहण्याच्या स्पर्धेत सोलापूर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गुरुलिंग कन्नोरकर यांनी प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेस देणगी देणारे देणगीदार सभासद, चन्नवीर सड्डू पंढरीनाथ लुंगारे, अनिल शेट्टी, विजयकुमार राऊत यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने साहित्यिक प्रा. डॉ. राजेंद्र दास यांचे ज्येष्ठ नागरिक म्हणजे *उतरतीउन्हे* या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्यान ऐकण्यास जुळे सोलापूर परिसराततील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर स्वातंत्र्य चळवळीचा दैदिप्यमान इतिहास ग्रंथ निर्मिती कार संजय जोगी पेठकर, कविवर्य मारुती कटकधोंड,
कविवर्य गोविंद काळे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अध्यक्ष रमाकांत साळुंके इत्यादी मान्यवरही उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष भगवानराव काशिद, उपाध्यक्ष अनिल हिरशेट्टी, सचिव विजयकुमार राऊत सहायक सचिव प्रल्हाद हटकर, कोषाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेवटी उपाध्यक्ष अनिल हिरशेट्टी यांनी उपस्थितांचे आभार मानले ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश्वर काळे यांनी केले


























