सोलापूर स्मार्ट सिटी योजने अंतर्गत स्काडा नियंत्रण प्रणालीचे काम प्रगतीपथावर असून या योजनेअंतर्गत उजनी जलवाहिनी, पाकणी जलशुध्दीकरण केंद्र, सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्र, भवानी पेठ जलशुध्दीकरण केंद्र व टाकळी जलवाहिनी येथे विविध प्रकारचे कामे प्रस्थावित आहेत. ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी शटडाऊन राहणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा तब्बल 25 दिवसापर्यंत 3 ऐवजी 4 दिवसानंतर होणार आहे. या निर्णयामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेणार आहे.
पाण्याचा वापर काटकसरीने करावा
येत्या काळात पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ही तांत्रिक बाबी सुधारणे गरजेचे आहे. सर्व नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसलीनं करून महापालिकेला सहकार्य करावं, हेच आमचं नागरिकांना आवाहन आहे. असं महापालिका आयुक्त संदीप करंजे यांनी सांगितलं.
पाणीपुरवठ्याचे नियोजन करता आले नाही
स्मार्ट सिटीची घोषणा करुन किती दिवस झाले. परंतु, आद्यापही पालिकेला पाणीपुरवठ्याचे नियोजन करता आले नाही. एक दिवसांनी पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आला.परंतु, त्यानंतरही पाणीपुरवठा कमी दाबाने झाला तर मात्र आमचे हाल होणार अशी प्रतिकिया नागरिक तुषार शिंदे यांनी दिली आहे.