सोलापूर – सोलापूर महानगरपालिका निवडणुका कधीही जाहीर होतील, नव्हे ही बातमी वाचण्यापूर्वीच मनपा निवडणूका जाहीर झालेल्या ही असतील., अशा परिस्थितीत मतदार राजा जागा हो! या शीर्षकाखाली मनपा मतदार यादीत घोळच घोळ भाग एक सादर करताना खेदजनक बोलावेसे वाटते की, प्रत्येक निवडणुकीत मतदार बंधू भगिनी, युवक,युवती या निवडणूक तारखेच्या दिवशी मतदान पोलिंग बूथ जवळील विविध उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदान बुथपासून 100 मीटर अंतरावर पेंडॉल टाकून मतदारांना मदत करण्यासाठी बसलेल्या ठिकाणी जाऊन, आपले मतदान हक्क बजावण्यासाठी स्लीपा मागणीसाठी येतात., त्यावेळी विविध उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदान आहे किंवा नाही हे शोधून सांगतात., अशी अवस्था गेल्या दहा ते पंधरा वर्षातील निवडणुकांमध्ये वाढत्या प्रमाणात दिसून येते., हा प्रकार किती गंभीर आहे याचा विचार मतदारांनी करावा.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मतदार याद्यात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. यातूनच मनपा निवडणुका जाहीर होणार अशी माहिती वारंवार प्रसिद्धी माध्यमातून येत असताना सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया कामकाज सुरू केले आहे., यात प्रभाग आरक्षण, जातीनिहाय आरक्षण व मतदार याद्यातील मतदान नोंदविण्याच्या हरकती नोंदविण्याचे जाहीर केले.
परंतु जातीनिहाय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही निकष सांगितले त्या निकषात जातीनिहाय आरक्षण झालेले नाही व प्रभाग आरक्षण बाबतीतही चुका झाल्याने दोन्ही आरक्षणे परत दुरुस्ती करावी अशा आदेशाने दोन वेळा आरक्षणाची सोडत काढण्यात आली याहूनही गंभीर बाब म्हणजे मतदार नोंदणी, या मतदार नोंदणीत इतका घोळ झालेला आहे तो घोळ शोधण्यासाठीही महानगरपालिका प्रशासनाला अशक्य आहे.
तर सर्वच राजकीय पक्षांना देखील अडचणीचे आहे. अशा परिस्थितीत आता मतदारांनीच आपली मते शोधण्याची वेळ आली आहे. म्हणून या लेखाद्वारे मतदार राजाला विनंती आहे., मतदार राजा जागा हो! आपापले मत शोधा हो! तरच आपला नगरसेवक आपण निवडून आणू शकतो, अन्यथा आपल्या मताचा अधिकारही आपण नोंदवू शकत नाही हे मात्र खरे.


























