सोलापूर – इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर हार्मनी द्वारा मोफत कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते . कॅन्सर हा एक असा रोग आहे ज्यामुळे लाखो करोडो लोकांचा मृत्यू झाला आहे, स्त्रियांमध्ये कॅन्सर खूप वाढत आहे, भारतात त्याचे प्रमाण खूप जास्त आहे, पण त्याला रोखला जाऊ शकते, त्यासाठी एचपीवी हा एक व्हायरस आहे (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) जो गर्भाशय च्या कर्करोगाचा एक मुख्य कारण आहे.
हे लसीकरण ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना दिले जाते. त्याचे दोन डोस असतात, पहिला डोस दिल्यावर सहा महिन्यांनी दुसरा डोस दिला जातो. १४ ते २६ वयोगटातील मुलींना तीन डोस द्यावे लागतात. या लसीकरणाबद्दल जागृती खूप कमी आहे, समाजात याविषयी जनजागृती करण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ़ सोलापूर हार्मनी द्वारा विविध ठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आली व त्यामध्ये विशेषतः पालकांना महत्व विशद केले.
प्रथम टप्प्यात मोदी स्थित सोना माता शाळेतील शंभर मुलींना एचपीव्ही लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी क्लबच्या अध्यक्षा सौ. किशोरी राठी, सचिवा सौ. आशा सेठिया सह सौ. अनुराधा चांडक,सौ. वंदना राठी,सौ. नेहा राठी, सौ. लक्ष्मी चव्हाण आदी उपस्थित होते . सौ. मालती प्रभाकर व डॉ. जयंती आडके यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले


























