धाराशिव – वाशी येथील अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिर मधील वर्ग पहिला ते वर्ग तिसरा येथील विद्यार्थ्यांचे श्रवण लेखन स्पर्धा येथील कुलदैवत संस्थेतर्फे घेण्यात आली होती. त्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना कुलदैवत चे सचिव बळीराम जगताप व अजिंक्य विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष एस.एल.पवार यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना एक कंपास एक वही व एक पेन वाटप करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पवार उपस्थित होत्या.
बक्षीस पात्र विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत. वर्ग पहिला प्रथम निकम प्रसाद बालाजी द्वितीय कवडे यशराज दत्ता तृतीय गपाठ सई किरण
वर्ग दुसरा प्रथम आराध्या संतोष घुले दुतीय वेदश्री क्रांतिसिंह नलवडे तृतीय जीदान तय्यब लोहार
वर्ग तिसरा प्रथम आरोही सचिन कवडे द्वितीय अविष्कार रामकृष्ण घुले तृतीय आरव रंगनाथ शेरकर उत्तेजनार्थ दिग्विजय लक्ष्मीकांत पवार या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका मनीषा पवार तसेच स्वप्नाली माने,संध्या कोल्हे, दिपाली सौताडेकर, पल्लव क्षीरसागर, यांनी परिश्रम घेतले.

























