सोलापूर : आगामी महानगरपालिका निवडणूक ही केवळ उमेदवारांची नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या ताकदीची निवडणूक आहे. कोणीही पक्षात आले तरी घाबरू नका, मी मी तुमच्या पाठिशी आहे. निष्ठावंतां निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आ. सुभाष देशमुख यांनी दिला.
भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूरच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चैत्राली लॉन्स, प्रताप नगर येथे आयोजित निर्धार मेळाव्यात आ. देशमुख बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर होत्या.
आ. देशमुख म्हणाले की, दोनवेळा आपण कार्यकर्त्यांसाठीच बाजार समिती निवडणुका हिमतीने लढल्या. आताही मी कार्यकर्त्यांसाठीच लढणार आहे. पक्षाच्या विविध घटकाकडून सर्व्हे होईल. त्यातून ज्यांना पसंती मिळेल, त्यांना उमेदवारी मिळेल. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी नाराज होऊ नये. पक्ष त्यांचा नक्की विचार करेल. आगामी काळात अनेकजण पक्षात येतील, मात्र पक्ष निश्चित निष्ठावंतांचा विचार करेल. या निर्धार मेळाव्यास तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी, डॉ. चनगोंडा हवीनाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल गायकवाड, राम जाधव, विशाल गायकवाड, शिवराज सरतापे, हेमंत पिंगळे, दैदिप्य वडापुरकर, महेश देवकर, दिलीप पतंगे यांच्यासह भाजपचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निष्ठावंतांवर अन्याय होणार नाहीः शहराध्यक्ष
पक्षात कोणीही येईल, निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही, याची दखल मी घेईन. तुम्ही घाबरू नका, असे शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या.

























