धाराशिव – धाराशिव नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत वातावरणात पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम पार पाडले. यादरम्यान कुठलेही उणीव भासू दिली नाही. आलेल्या प्रत्येक अडचणीवर सामूहिकपणे मार्ग काढण्यात सामूहिक योगदान राहिले. त्यामुळेच ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत व निर्गुघ्नपणे पार पडली.
मतदानाची तारीख जाहीर झाल्यापासून उमेदवारांचे अर्ज भरून घेणे, छाननी करणे, माघार घेणे, आक्षेप आलेल्या अर्जावर निसंकोचपणे व निष्पक्षपातीपणे भूमिका घेऊन सर्वांना न्याय देण्याचे काम केले. तर व्यवस्थित व १०० टक्के व्हावे यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यासह चेक पोस्टवर बंदोबस्त ठेवणे, मतदान करुन घेणे, मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवणे तसेच मतदान मोजणी अत्यंत शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी अतिशय मोलाची भूमिका पार पाडली. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निःश्वास टाकता आला.
या कर्मचाऱ्यांना आपल्या केलेल्या कर्तव्याची आठवण व स्मरणात रहावी यासाठी मत मोजणी कक्षामध्ये त्यांचा फोटो काढण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह अधिकारी कर्मचारी दिसत आहेत.


























