नवीन नांदेड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे प्रदेश महासचिव तथा मनपाचे माजी विरोधी पक्ष नेता जीवन पाटील घोगरे यांच्या गाडीवर दगडफेक करून. त्यांना मारहाण करत आरोपीने आपल्या गाडीतून अपहरण करून अज्ञात ठिकाणी नेऊन मारहाण करण्याची घटना दिनांक २२ डिसेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली ही घटना आर्थिक व्यवहाराच्या वादातून घडल्याची माहिती मिळाली. या घटनेतील सात आरोपींना नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव नेहमीप्रमाणे आपल्या घरून स्वतःच्या इनोव्हा कार मधून अण्णाभाऊ साठे चौक सिडको येथून ते ज्ञानेश्वर नगर कडे जात असताना. येथील बडोदा बँकेच्या समोर त्यांच्या कारला स्कार्पिओ आडवी लावून जीवन पाटील घोगरे यांच्या कारवर दगडफेक करून त्यांना मारहाण करत. त्यांच्या गाडीतून ओढून काढून आरोपींनी आपल्या स्कार्पियो मध्ये टाकून पसार झाले. ही सर्व घटना बडोदा बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
सदरील फुटेच्या आधारे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी तपासाची चक्रे फिरवून शोधाशोध करण्यात आली. संजय पाटील घोगरे यांनी आपले राजकीय पाठबळाचा वापर करून जिल्ह्यातील पोलीस प्रशासनास तातडीने कामाला लावल्याने मोठा अनर्थ टळला. तरीही आरोपीने जीवन घोगरे यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीने आपला बचाव करण्यासाठी अपहरण केलेल्या जीवन पाटील घोगरे यांना मारहाण करून मुसलमान वाडी परिसरात सोडून पळ काढला पण पोलिसांनी सर्वत्र नाकेबदी केल्याने लोहा पोलीस ठाणे हद्दीत स्कार्पिओ आणि सात आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.
जीवन घोगरे पाटील यांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आमदार प्रताप पाटील चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यासोबत माझा आर्थिक व्यवहार होता. त्यातूनच व राजकीय वैमन्यशातून माझे अपहरण करून मला व माझ्या कुटुंबीयास जीवे मारण्याची धमकी वरील लोकांकडून वारंवार येत होती. असे घोगरे यांनी आपल्या तक्रारी त नमूद केले आहे. सदरील प्रकरणात आरोपी शुभम सुनेवाड रा. वसरणी, राहुल दासरवाड रा. मालेगाव, कौस्तुभ रणवीर रा.भावसार चौक नांदेड, विवेक सूर्यवंशी रा. गणेश नगर नांदेड, माधव वाघमारे गणेश नगर नांदेड, मोहम्मद अफरोज रा. गिरगाव तालुका वसमत, देवानंद भोळे रा. नांदुसा त नांदेड त्यांच्याविरुद्ध ११८(१ )
३५२,३५२(२),३५१(२),३५१(३),४९,१४०(३),१८९(२),१५१(२),१९१(३) कलम अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे याप्रकरणी तपास पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपाधीक्षक प्रशांत शिंदे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड हे पुढील तपास करीत आहेत.


























