सोयगाव / संभाजीनगर – लायन्स नेत्र रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर व भारतीय जनता पार्टी, सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचा एकूण ३७५ रुग्णांनी लाभ घेतला,ही बाब उल्लेखनीय ठरली.
या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून गरजू रुग्णांना माफक दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले.नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.या कार्यक्रमास अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष ईद्रीस मुलतानी,महिला मोर्चा अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे,जयप्रकाश चव्हाण,माजी नगराध्यक्ष कैलास काळे,माजी सरपंच वसंत बनकर,नगरसेवक राजेंद्र जावळे,जिल्हा चिटणीस सुनील गावंडे,तालुका अध्यक्ष संजय पाटील, शहराध्यक्ष मंगेश सोहनी,खरेदी-विक्री संघ संचालक मयूर मनगटे,जिल्हा सरचिटणीस विशाल गिरी, प्रमोद पाटील,सुनील ठोंबरे,भैय्या देसले,राहुल राठोड,राजेंद्र म्हसके,सुरज कवाळ,राजू रेकनोद,बद्री राठोड,संजय चौधरी व संजय आगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखीत केले.गरजू रुग्णांना मोफत सेवा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल लायन्स नेत्र रुग्णालय व भारतीय जनता पार्टी सोयगावच्या कार्यकर्त्यांचे उपस्थितांनी कौतुक केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप सोयगाव शहर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


























