सांगोला – फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय परीषदेचे उद्घाटन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्ञ विद्यापीठ लोणेरेचे कुलगुरु कर्नल कारभारी काळे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक डाॅ.नवनाथ पासलकर, संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डाॅ.अमित रूपनर, इस्टेट डायरेक्टर डाॅ.संजय आदाटे, इंजिनिअरिंगचे प्राचार्य डाॅ.रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ.विद्याराणी क्षीरसागर, पाॅलिटेक्निकचे प्राचार्य तानाजी बुरूंगले, फार्मचीचे प्राचार्य डाॅ.संजय बैस, पब्लिक स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील, डाॅ.सविता सोनवणे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी डाॅ.तृप्ती बनसोडे, प्रा.जयश्री मदने यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
हि परिषद दि.२३ व २४ डिसेंबर या कालावधीत होत असून या परिषदेत इंजि.प्रविणकुमार पाल (अमेरिका), डॉ.अशोक रानडे (कॅनडा), डॉ.अजयकुमार मिश्रा (दक्षिण आफ्रिका), डॉ.राघवेंद्र गुप्ता (गुवाहाटी), डॉ.सयाजी म्हेञे (मुंबई), डॉ.शिवाजी पवार (कोल्हापूर), डॉ.अर्चना ठोसर (पुणे), डॉ.पंकज आवटे (बुधगाव- सांगली), डॉ.प्रकाश बनसोडे (सांगोला) हे वक्ते सहभागी झाले आहेत. या परिषदेचे सुञसंचलन वनिता बाबर यांनी केले. हि परिषद यशस्वी करण्यासाठी कॉलेज मधील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी परीश्रम घेत आहेत.


























