Wednesday, August 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पहिल्याच दिवशी १०७४ नामनिर्देशन अर्जांची विक्री

तरुण भारतbyतरुण भारत
December 24, 2025
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी विविध ७ निवडणूक कार्यालयाअंतर्गत उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. इच्छुक उमेदवार आणि प्रतिनिधीनी प्रत्येकी चार नामनिर्देशान पत्र घेतले. पहिल्याच दिवशी १ हजार ७४ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली.आजच्या पहिल्याच दिवशी माजी सभागृह नेते सुरेश पाटील,शिवानंद पाटील यांच्यासह माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत.मंगळवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. 

            राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सोलापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत नियोजित वेळापत्रकानुसार राबविण्यात येत आहे.  महापालिका निवडणुकीसाठी नॉर्थकोट प्रशालेच्या आवारात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार, २३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. २३ ते ३० डिसेंबर या कालावधी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत दोन सुटीचे दिवस वगळता अर्ज भरण्यासाठी सहा दिवस मिळणार आहेत. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी नॉर्थकोट प्रशालेत प्रभागनिहाय सात निवडणूक कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. २६ महापालिकेच्या एकूण प्रभागातील १०२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या प्रभागातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अ, ब, क, ड या गटानुसार भरून घेतले जात आहेत. नॉर्थकोट प्रशालेत प्रभागनिहाय सात निवडणूक  कार्यालयात हे अर्ज स्वीकारले गेले. नॉर्थकोट प्रशालेत सात  निवडणूक कार्यालयांसह आचारसंहिता कक्ष तयार करण्यात आला आहे. 

विविध सात कार्यालयनिहाय 

अर्ज विक्रीचा तपशील असा

निवडणूक निर्णय अधिकारी -१ : १६७, 

निवडणूक निर्णय अधिकारी-२ : १९२

निवडणूक निर्णय अधिकारी-३ : १३०

निवडणूक निर्णय अधिकारी ४ : १२०

निवडणूक निर्णय अधिकारी-५ : १७१

निवडणूक निर्णय अधिकारी-६ : १२६

निवडणूक निर्णय अधिकारी-७ : १६८

आज एकूण १०७४ नामनिर्देशन अर्जांची 

विक्री झाली आहे.

खुल्या प्रवर्गासाठी ५ हजार तर आरक्षितसाठी 

२५०० रूपये अनामत रक्कम 

        सोलापूर महानगरपालिकेने निवडणूकीसाठी नॉर्थकोट प्रशालेत ७ निवडणूक निर्णय अधिकारी नेमणूक करून त्यांच्याकडे प्रत्येकी ४ प्रभागातील उमेदवारी अर्ज घेणे आणि दाखल करून घेण्याची सोय करण्यात आली आहे. १०० रूपयांना अर्ज मिळत असून उमेदवारी दाखल करताना खुल्या गटासाठी ५ हजार रूपये तर आरक्षित गटासाठी २५०० रूपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. 

मनपा प्रशासकीय इमारतीतील एक खिडकी कक्षात मोठी गर्दी 

महापालिकेने अर्ज दाखल करताना ज्या एनओसी घेणे गरजेचं आहे त्यासाठी एक खिडकी योजना महापालिका प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू केली आहे. या ठिकाणी चार खिडक्यांची सोय करण्यात आली आहे.

सकाळी पालिकेत एक खिडकीवर झुंबड उडाली होती.

भारतरत्न डॉ. आंबेडकर पुतळा ते डफरिन चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद 

  नॉर्थकोट प्रशालेत उमेदवारी अर्ज घेण्यासाठी लोक रांगेत थांबले होते. यात महिलांचाही समावेश अधिक होता. पोलीस प्रशासनानं भारतरत्न डॉ. आंबेडकर पुतळा ते डफरिन चौक हा रस्ता एका बाजूने बॅरिकेटींग करून वाहनांसाठी बंद केला होता. सकाळी 11 ते तीन वाजे दरम्यान हा रस्ता बंद करण्यात आला. महापालिका आवारात तसेच स्मृती मंदिर आवारात पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त तगडा होता.

१९ पानांचा उमेदवारी अर्ज भरावा लागणार 

महापालिकेसाठी उमेदवारांना १९ पानांचा उमेदवारी अर्ज भरावा लागेल. पहिल्या चार पानांवर उमेदवाराचे संपूर्ण नाव, प्रभाग क्रमांक, जागा क्रमांक, राखीव प्रवर्ग, वैयक्तिक माहिती आणि उमेदवाराचा मतदार यादीतील तपशील, सूचक अनुमोदकाची माहिती आणि सही आदी माहिती भरावी लागेल.शपथपत्रामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती. १२ सप्टेंबर २००१ नंतर दोनपेक्षा जास्त अपत्ये नसल्याची माहिती द्यावी लागेल. अन्यथा हा उमेदवार अपात्र होऊ शकतो. उमेदवारावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची आणि न्यायालयीन दाव्यांची माहिती जोडणे बंधनकारक आहे.

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली पाहणी

नॉर्थकोट प्रशाला येथील विविध 7 निवडणूक अधिकारी कार्यालय (आरओ) आचारसंहिता कक्ष यासह विविध कार्यालयांची महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज सकाळीच अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. विविध सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, विद्युत अभियंता राजेश परदेशी , कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Post Views: 77
Previous Post

प्रत्येक वाहनाची नियमाप्रमाणे तपासणी करावी

Next Post

फॅबटेक मध्ये आंतराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

फॅबटेक मध्ये आंतराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन 

ताज्या बातम्या

सोलापुरात डॉक्टरांनी केले निदर्शन

August 5, 2026

सोलापूर तरुण भारत – Short Updates

August 5, 2026

सुनेत्रा पवार म्हणाल्या चोख उत्तर देईन

August 5, 2026

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याबद्दल बोलले फडणवीस

August 5, 2026

गप्पा पडल्या महागात पहा पुढे झाले काय

August 5, 2026

बांगलादेश बॉर्डरवर भारतीय जवानाने थेट तंबी दिली

August 5, 2026

आ देशमुख म्हणाले आपत्ती व्यवस्थापनाचे नक्की ऐका #solapur #getmoreviews #getrich

August 4, 2026

Gen z चा मुख्यमंत्र्या सोबत नारा #marathinews #maharashtranews #getmoreviews #getmoresubscribers

August 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1028629

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!