वसमत / हिंगोली – नुकत्याच झालेल्या वसमत नगरपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक शेख नय्यूम पाशा व कादर कुरेशी तसेच दीपक कातोरे सर यांचा इर्शाद पठाण (बादशाह ग्रुप) व मजहर मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा करण्यात आला. या कार्यक्रमात दोन्ही नगरसेवकांचा हार व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते व नागरिकांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते सदैव तत्पर राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी शेख नय्यूम पाशा व कादर कुरेशी यांनी नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू,” असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे सत्कार सोहळा विशेष लक्षवेधी ठरला.
























