सोलापूर : वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील प्रा. दर्शन प्रदीप पंडित यांना मध्यप्रदेशातील सेहोर येथील मन्सरोवर ग्लोबल विद्यापीठाकडून पीएचडी (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
प्रा. दर्शन प्रदीप पंडित यांनी “नेक्स्ट-जेन आयओटी डेव्हलपमेंट : अ कटिंग-एज सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग फ्रेमवर्क विथ ब्लॉकचेन अँड स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स” या विषयावर सखोल संशोधन प्रबंध सादर केला होता. या संशोधनात इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), ब्लॉकचेन आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा समन्वय साधत विकसित करण्यात आलेल्या नव्या सॉफ्टवेअर अभियांत्रिकी चौकटीचा अभ्यास करण्यात आला आहे. भविष्यातील डिजिटल तसेच औद्योगिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
या संशोधनासाठी डॉ. प्रा. पंडित यांना डॉ. मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. प्रा. दर्शन पंडित यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, समस्त विश्वस्त, प्राचार्य

























