पारध / जालना – जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील पारध शाहुराजा येथील राजर्षी शाहु कला व वाणिज्य विज्ञान महाविदयालय तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडां विद्यापीठं यांच्यां संयुक्त विद्यमाने सावंगी अवघडरावं येथे विशेष निवासी श्रमशिबीराचे आयोजन प्रसंगी बोलतांना आपल्या भाषणात म्हणाले की, आज गल्ली ते दिल्ली संपूर्ण देशात तील नैसर्गिक व सामाजिक पर्यावरण असंतुलित होते आहे.
काही आपत्ती या नैसर्गिक तर काही मानवनिर्मित आहे त्याचा संपूर्ण मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे याबाबतची जनजागृती करण्याची जबाबदारी आज राष्ट्रीय सेवा योजना सारख्या समाज उपयोगी उपक्रमातून होऊ शकते असे प्रतिपादन जे. इ.एस. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. यशवंत सोनुने यांनी काल राजर्षी शाहू महाविद्यालय पारध यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी उद्घाटक म्हणून प्रो. डॉ. सुगदेव मांटे यांनी संत गाडगेबाबा, महात्मा गांधी व बाबा आमटे यांच्या विचाराचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन कार्य करावे असे प्रतिपादन केले पूर्वीचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आणि आत्ताचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर यामध्ये फरक आहे असेही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी चैतन्य देवेंद्र स्वामी यांनी विद्यार्थ्यांनी आई-वडील व राष्ट्राचे सेवा करावे असे आव्हान केले यावेळी प्राचार्य डॉ.राजाराम डोईफोडे यांना जन भूषण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे व प्रा. रामेश्वर पाडळे यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे यांनी व्यक्तिने काम करत रहाव फळाची अपेक्षा न करता काम केले तर आपल्या कामाची कुठेतरी दखल होते असे सत्काराला उत्तर देताना म्हटले. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये कार्यक्रम अधिकारी प्रा. रवींद्र पानपाटील यांनी सात दिवस चालणाऱ्या या विशेष शिबिराच्या आयोजनामध्ये होणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली यामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर विविध सांस्कृतिक कार्यक्रम विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी यासारखे विविध कार्यक्रम व गावात विविध उपक्रम आयोजित केल्याची माहिती दिली यावेळी मंचावर गावचे प्रतिनिधी म्हणून गणेश फुसे, मराठी प्राथमिक शाळेचे सहाय्यक सहशिक्षक श्री. अल्हाट, उपप्राचार्य प्रा.अमोल बांडगे, कार्यालयीन अधीक्षक किशोर वाघ यांची उपस्थिती होती. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना ध्वजाचे ध्वजारोहण प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले तदनंतर मान्यवरांच्या हस्ते एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत लावलेल्या वृक्षांना पाणी देऊन उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना लक्ष गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रा. दिनेश कापरे, प्रा. राजू शिंदे, प्रा. लक्ष्मण सुसर, प्रा. लक्ष्मण खरात, प्रा. मंगेश लोखंडे, श्री विश्वास लोखंडे, तुकाराम लोखंडे, राहुल सुरडकर, कृष्णा आल्हाट, संजय तबडे यांनी यांची प्रमुख उपस्थिती होती व यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय समन्वयक प्रा. अनिल मगर यांनी तर आभार दिपाली इंगळे या स्वयंसेवीकेने केले. यावेळी यावेळी गावकरी विद्यार्थी स्वयंसेवक, विद्यार्थिनी स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

























