पंढरपूर – तालुक्यातील आंबे येथील वाळु माफिया व सराईत गुन्हेगार शंकर उर्फ विन्या लिंगा भोसले (वय ३३ ) यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येथील तालुका पोलिसांनी एमपीडीए कायदयाअर्तगत स्थानबध्द करून येरवाडा जेल येथे रवाना केले.
या कारवाई बाबतची येथील तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी सांगितले की,शंकर उर्फ विन्या लिंग भोसले यास लोक विन्या या नावाने देखील परिचित आहे. शंकर उर्फ विन्या भोसले हा कुठल्याही प्रकारचा वैदय उदयोग, धंदा अगर व्यवसाय करीत नव्हता.पंढरपुर तालुका हददीतील मौजे आझेवाडी, पंढरपूर, व मंगळवेढा शहर आसपासचे परीसरात भिमा नदी व माण नदी पात्रातुन वाळु चोरी करून त्याची विक्री करून त्यातुन मिळणारे पैशाचे जोरावर परीसरातील सर्वसामान्य जनतेत तो भितीचे वातावरण निर्माण करीत होता. त्याच्या कृत्यामुळे पंढरपुर तालुका व मंगळवेढा शहराचे आसपासचे परीसरातील सार्वजनिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दमदाटी करणे भीतीचे वातावरण तयार करणे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रासदायक झाले होते.
दरम्यान शंकर उर्फ बिना लिंगा भोसले याने पंढरपुर तालुका व शहराचे आसपासचे परीसरात दहशतीचे कृत्य करून त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक असा “वाळु तस्कर” म्हणुन स्वतःला सिध्द केले होते. त्यामुळे त्याचे विरुध्द पंढरपूर तालुका, व इतर पोलीस ठाणे अर्तगत एकुण ९ गुन्हे दाखल असुन त्यामध्ये सरकारी कामात अढथळा करणे, चोरी करणे, वाळु तस्करी करणे व सर्व सामान्य लोकांमध्ये दहशत निर्मान करणे असे वेगवेळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होते. त्याअनुषंगाने विन्या भोसले विरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करणे व त्याच्या कृत्यांना आळा घाळणे अत्यंत आवश्यक असल्याने एम.पी.डी.ए.कायदयाअतर्गत त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठविला होता.
त्या नंतर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी एमपीडीए कायदयातील तरतुदीनुसार शंकर उर्फ विन्या लिंगा भोसले याचे विरुध्द स्थानबध्दतेचा आदेश करुन त्यास ताब्यात २३ डिसेंबर २०२५ रोजी ताब्यात घेऊन अटक करून २४ डिसेंबर २०२५ रोजी मध्य रात्री येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबध्द करण्यासाठी रवाना केले.
दरम्यान ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर यांच्या आदेशा प्रमाणे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, येथील उपविभागिय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक टी.वाय.मुजावर, पोसई भारत भोसले, पोसई विक्रम वडणे, पोसई .दत्तात्रय तोंडले, सहा.फौजदार विजयकुमार गायकवाड, जनार्धन करे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिस शेख, स्थानिक गुन्हे शाखा पोहेकॉ मंगेश रोकडे, दिपक भोसले, पोलीस हवालदार सुहास देशमुख स्वप्निल वाडदेकर पोकॉसागर गवळी, संजय गुटाळ, चालक हासेन नदाफ, चालक पोकॉ विलास घाडगे, विजयकुमार आवटी, सायबर सेलचे पोलीस हवालदार रतन जाधव आणि वसंत कांबळे यांचे पथकाने केली.

























