समृद्धी महामार्गावर भरधाव कार थेट संरक्षण कठड्यावर चढली, ३० फूट खोल पडणार तोच…; पाहा VIDEO pic.twitter.com/3CBiHzpGwc
— Renuka Dhaybar (@renu96dhaybar) February 13, 2023
समृद्धी महामार्गावर अपघाताची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे भरधाव वेगात असलेली कार थेट संरक्षण कठड्यावर चढली अन् खाली कोसळता कोसळता वाचली. अगदी थोडक्यात कार चालकाचा जीव वाचला आहे. या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही हादराल. खरंतर, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे दोन महिन्यांपूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या महामार्गावर वाहन चालकांना वेग मर्यादादेखील देण्यात आलेली आहे. परंतु काही वाहन चालक वेग मर्यादेचं उल्लंघन करताना दिसत असून अपघातांच्या संख्येतदेखील प्रचंड वाढ झाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सोमवारी दुपारी एक भरधाव कार समृद्धी महामार्गाच्या कोपरगाव येथील टोलनाक्याजवळ असलेल्या संरक्षण कठड्यावर चढली. यामध्ये संरक्षण कठड्याचा काही भाग फुटला असून कार अर्धी बाहेर आली होती. रस्त्यापासून पुलाची उंची २५ ते ३० फूट आहे. सुदैवाने संरक्षण कठड्याजवळ कार अडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. चालकदेखील यामध्ये बालंबाल बचावला आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.