सोलापूर – एस. व्ही. सी. एस. हायस्कूल एमआयडीसी येथे थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे यांच्या हस्ते रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक धनंजय नकाते व पर्यवेक्षण संतोषकुमार तारके यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर ज्येष्ठ शिक्षिका सुलोचना विजपुरे यांनी रामानुजन यांनी गणित विषयांमध्ये मांडलेल्या संकल्पनेविषयी विस्तृत माहिती दिली.
24 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या गणित संबोध स्पर्धा परीक्षेत प्रशालेतील 70 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. प्रशालेचा निकाल 100% लागला असून 4 गुणवंत विद्यार्थ्यांना शहर गणित अध्यापक मंडळाकडून सुवर्णपदक, प्रमाणपत्र व शाळेला एक सन्मानचिन्ह म्हणून ट्रॉफी देण्यात आली होती त्याचप्रमाणे श्रद्धा संस्था सोलापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अबॅकस व वैदिक गणित स्पर्धेत सूयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गणित दिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व गणित शिक्षक- शिक्षिका यांनी प्रयत्न केले.

























