सोलापूर : श्री अय्यप्पास्वामी अन्नदान सेवा संघमतर्फे गुरुवारी श्री अय्यप्पास्वामींची महापडीपूजा (१८ पायऱ्याची पूजा) कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडला. यानिमित्त ११ हजार ५०० भविकांना महाप्रसाद देण्यात आला.
अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील भंडारी सन्निधानम् येथे हा कार्यक्रम झाला.कार्तिक पौर्णिमा ते मकर संक्रांती अशा ४८ दिवसांच्या कालावधीत अय्यप्पास्वामींची दीक्षा (कडक व्रत) घेतले जाते.
सोलापुरात यंदा १०४ भक्तगणांनी ही दीक्षा घेतली आहे. या व्रतअंतर्गत महापडीपूजा मोठ्या प्रमाणात करण्यात येते. संघातर्फे महापडीपुजेनिमित्त गुरुवारी पहाटेपासूनच विविध पूजाविधी कृष्णन कल्लमपिल्ले (गुरुस्वामी) यांच्या दिव्य सानिध्यात करण्यात आले. यामध्ये महागणपती होमहवन, अभिषेक, सुब्रमण्यमस्वामी अभिषेक, धर्मशास्ता आवाहनम, महाआरती आदींचा समावेश होता. याशिवाय सच्चिदानंदस्वामी, कृष्णाहरी पोट्टावत्री, जगनमोहन क्यातम, मनोहर गुंडेटी, राजू गुज्जेटी, राम स्वामी, चंद्रकांत होटकर यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला.
महापडीपूजेनिमित्त महाप्रसाद देण्यात आला. याचा सुमारे 11 हजार 500 भाविकांनी लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक सत्यनारायण भंडारी, अध्यक्ष रचन भंडारी, उपाध्यक्ष प्रकाश चन्ना, खजिनदार भूमण्णा कॉडी, सचिव अरविंद जिल्ला (पंतुलू), विश्वस्त विकास पलगंटी, अनिल चिप्पा, नरेश भंडारी, राकेश गरदास, आयलेश यल्ला, श्रीनिवास सुरा, सुधीर मासम, श्रीनिवास राव, वासुदेव शेरला, नरेश मैले, हरिदास बुरा, संतोष माटेटी, रोहित इप्पलपल्ली, सुहास पल्ली, किरण पल्ली, विशाल नल्ला आदींनी परिश्रम घेतले.

























