बार्शी – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर यांच्यावतीने दि. २४ डिसेंबर रोजी भव्य व दिव्य अशा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आले असून, यामध्ये दैनिक संचारचे उपसंपादक तथा स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी येथील सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे तृतीयपंथी किरण मस्तानी यांची विशेष निवड करण्यात आली होती
पारलिंगी (तृतीयपंथी) किरण मस्तानी हिचा सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, संतोष पवार, राकेश टेळे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार सघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कारानंतर सोलापूर जिल्ह्यासह बार्शी परिसरातून किरण मस्तानी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध सामाजिक, राजकीय व पत्रकार बांधवांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून, समाजातील सर्वसामान्य घटकांच्या संघर्ष व योगदानाची पावती असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


























