Sunday, September 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अकलूजमध्ये ७० वर्षांच्या प्रस्थापित सत्तेला भाजपाची तगडी धडक; १० हजार मतांसह भाजपाचा ‘नैतिक विजय’

तरुण भारतbyतरुण भारत
December 26, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिलीव – गेल्या ७० वर्षांपासून अकलूजमधील राजकीय व्यवस्थेवर असलेल्या मोहिते-पाटलांच्या वर्चस्वाला यंदा भारतीय जनता पार्टीने जोरदार आव्हान दिले.अकलूज नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रस्थापित व्यवस्थेविरोधात भाजपाने ‘कमळ’ चिन्हावर आपले पॅनल उभे करून निकराची लढत दिली. जरी पूर्ण सत्ता मिळाली नसली, तरी मिळालेला जनादेश हा आमचा ‘नैतिक विजय’ असून हा प्रस्थापितांच्या पतनाचा प्रारंभ आहे, अशी भूमिका भाजपा माजी आमदार राम सातपुते यांनी मांडली अकलूज येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी भाजप अकलूज मंडळ अध्यक्ष सुजयसिंह माने पाटील,शहर अध्यक्ष महादेव कावळे, शैलेश कोतमिरे,नूतन नगरसेवक राहुल लोंढे, महेश शिंदे, नगरसेविका दिपाली वाघमोडे,जयश्री एकतपुरे व सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पूजाताई कोतमीरे यांना अकलूजच्या जनतेने सुमारे १० हजार मतांचा भरघोस कौल दिला.विजयी उमेदवाराला ५१ टक्के मते मिळाली असली, तरी एकट्या भाजपाने कोणाचीही मदत न घेता ४१ टक्क्यांहून अधिक मते मिळवून विरोधकांच्या गोटात धडकी भरवली आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजपाचे उमेदवार अवघ्या २० ते ३० मतांच्या फरकाने पराभूत झाले असल्याचे मा.आ.राम सातपुते यांनी सांगितले.

कोणतेही संस्थात्मक पाठबळ, साखर कारखाने किंवा मोठी आर्थिक रसद नसताना भाजपाचे चार सामान्य पार्श्वभूमीचे उमेदवार निवडून आले आहेत. नूतन नगरसेवक महेश शिंदे चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आक्रमक विरोधी आवाज मांडणार असून दिपाली वाघमोडे या एका सामान्य रिक्षाचालकाच्या पत्नी असून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला.राहुल लोंढे हे बौद्ध समाजातील आणि दलित चळवळीतील कार्यकर्ता, ज्यांनी सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला तर जयश्रीताई एकतपुरे या माळी समाजातून निवडून आलेल्या सक्षम महिला प्रतिनिधी आहेत.

माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते-पाटलांच्या विजयावर बोचरी टीका करताना म्हटले की, “विरोधकांकडे दोन साखर कारखाने, आमदार, खासदार आणि माजी उपमुख्यमंत्र्यांची फौज होती. तरीही त्यांना विजयासाठी गल्लीबोळात फिरावे लागले आणि पैशांचा वापर करावा लागला. हा विजय म्हणजे एखादा पेशंट ‘आयसीयू’ मधून ‘जनरल वार्ड’ मध्ये शिफ्ट झाल्यासारखा आहे. त्यांची सत्ता आता खिळखिळी झाली आहे.”

निवडणुकीनंतर बोलताना भाजपा माजी आमदार राम सातपुते यांनी  स्पष्ट केले की,कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले आणि राऊत नगरमधील दगडफेकीसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. संविधानाच्या मार्गाने या विकृत राजकारणाचा प्रतिकार केला जाईल.अकलूजमध्ये लवकरच भाजपाचे भव्य कार्यालय सुरू होणार असून, सर्व नगरसेवक तिथे जनतेच्या कामासाठी उपलब्ध असतील.बांधकाम परवाने किंवा जमिनींचे दाखले यासाठी अकलूजच्या जनतेला एक रुपयाही कोणाला द्यावा लागणार नाही, याची काळजी भाजपाचे चारही नगरसेवक घेतील.

या लढ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल  त्यांचे आभार मानत “ही केवळ निवडणुकीची सांगता नसून, अकलूजमधील नव्या पर्वाची सुरुवात आहे,” असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Post Views: 77
Previous Post

तृतीयपंथी किरण मस्तानी हिचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान

Next Post

ओंकारचे चेअरमन थेट शेतकऱ्यांच्या ऊसाच्या फङात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ओंकारचे चेअरमन थेट शेतकऱ्यांच्या ऊसाच्या फङात

ताज्या बातम्या

पार्थिव गणेशाची खरी पद्धत सांगतायत पंचांगकर्ते मोहन दाते#solapur

September 13, 2026
विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

September 13, 2026

प्रभाग क्र. ११ कुंभार गल्लीतील वर्षानुवर्षे बंद असलेला बोअर सुरू

September 13, 2026

गणेशोत्सवानिमित्त सी. बी. खेडगी महाविद्यालयात व्याख्यानमाला

September 13, 2026

बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ

September 13, 2026

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #news #marathinews #latestnews

September 12, 2026

गुन्हे शाखेने केली महत्वाची कामगिरी

September 12, 2026

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला #solapurnews #news

September 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1199832

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!