भोकरदन / जालना : आज दिनांक 24/12/2025 रोजी पोलीस ठाणे भोकरदन येथील प्रभारी अधिकारी किरण बिडवे यांना त्याच्या गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दिनांक 25/12/2025 रोजी मध्य रात्रीच्या सुमारास भोकरदन येथे दानापुर ते भोकरदन मार्ग रात्री बोलेरो मॅक्स पिक अप क्रमाक M.H.28.B.B.0825 व M.P.68 ZD.3414 मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत सुगंधीत पान मसाला भोकरदन येथे विक्रीसाठी एका इसमाला पुरविण्यात येणाऱ्या असल्याची खात्रीलायक माहीती सदरची माहीती मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो श्री. नितीन कटेकर यांना देऊन पोलीस निरीक्षक श्री. किरण बिडवे यांनी पोलीस ठाणे भोकरदन येथे त्याच्यासह पोलीस उपनिरीक्षक श्री. सागर शिंदे, पोलीस अंमलदार 1689 गणेश पिंपळकर, पो.अ. 830 योगेश गवळी, पो.अ. 1028 सतिष दोडके, पो.अ. 1317 शरद शिंदे, यांचे पथक तयार करुन दोन पंचासह रवाना होऊन दिनांक 25/12/2025 रोजी 01:10 वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे भोकरदन हद्यीतील वरुड फाट्याजवळील भंडारगड येथे मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी हजर असताना दानापुर कडे येताना बोलेरो मॅक्स पिक अप क्रंमाक M.H.28.B.B.0825 व M.P.68 ZD.3414 असे दोन बोलेरो मॅक्स पिकअप दिसुन आले असता त्यांनी पोलीसा पाहुन सदरचे पिकअप हे रस्तावर वळवुन वरुडफाटयाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले असता बोलेरो पिकअप चालक त्यांना बोलेरो पिकअप मध्ये काय आहे याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत पान मसाला, विमल गुटखा, राजनिवास गुटखा, जाफरानी जर्दा अशा गुटख्याच्या गोण्या मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष पंचनामा केला.
आरोपीतांनी सदरचा गुटखा भोकरदन येथील इसम नामे फिरोज खान मेहमुद खान याना पुरवण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगीतले आहे खालीलप्रमाणे बोलेरो मॅक्स पिकअप M. H.28.B.B.6825 खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला. 1. 7,34,400 /- रु ज्यात राज निवास सुंगधीत पान मसाला वर्णनाचे 17 गोण्या एका गोणीमध्ये 09 बंग व एका बॅगमध्ये 25 पुडे ज्याची प्रत्येकी पुड्याची किंमत 192:00 असे एकुण 3825 पुडे 2. 1,83,600/- ज्यात झेडएल- 01 जाफरानी जर्दा वर्णनाचे 17 गोण्या एक गोणीमध्ये 09 बंग व एका बॅगमध्ये 25 पुडे ज्याची प्रत्येकी पुडयाची किंमत 48:00 रुपये असे एकूण 3825 पुडे 3. 10,00,000/- एक महिंद्रा कंपनीचा पांढ-या रंगाचा बोलेरो मॅक्स पिकअप ज्याचा आर. टी. ओ नोंदणी क्रं M.H.28.B.B.0825 असा जु. वा. किं अंदाजे. तसेच वाहन क्रंमाक M.P.68.ZD.3414 मध्ये असलेल्या मुद्येमालाची पाहणी केली असता त्यामध्ये मिळुन आलेल्या मुद्येमालाचे वर्णन खालीलप्रमाणे 1. 2,35,000/- ज्यात विमल पान मसाला (मोठे) वर्णनाचे 05 गोण्या एक गोणीमध्ये 05 बॅग व एका बॅगमध्ये 20 पुडे ज्याची प्रत्येकी पुड्याची किंमत : 470.00 असे एकुण 500 पुडे 15,000 /- ज्यात विमल तंबाखु (मोठे) V- 1 वर्णनाचे 05 गोण्या एक गोणीमध्ये 05 बंग व एका बॅगमध्ये 20 पुडे ज्याची प्रत्येकी पुडयाची किंमत 30 रुपये असे एकुण 500 पुडे 3. 87,120/- ज्यात विमल पान मसाला (लहान) V- 1 वर्णनाचे 02 गोण्या एक गोणीमध्ये 10 बेंग व एका बंगमध्ये 22 पुढे ज्याची प्रत्येकी पुडयाची किंमत 198.00 असे एकुण 440 पुडे 4. 9.680/- ज्यात विमल तंबाखु (लहान) वर्णनाचे 02 गोण्या एक गोणीमध्ये 10 बॅग व एका बॅगमध्ये 22 पुडे ज्याची प्रत्येकी पुडयाची किंमत 22.00 रुपये असे एकूण 440 पुडे 5. 10,00,000/- एक महिंद्रा कंपनीचा पांढ-या रंगाचा बोलेरो मॅक्स पिकअप पुढील बाजुस डाव्या बाजुला डेंट असलेला ज्याचा आर. टी. ओ नोंदणी क्रं एम. पी 68 झेड, डी 3414 असा जु. वा. किं अंदाजे. असे एकुण – 32,64,800 रुपये किंमतीचा वर नमुदप्रमाणे गुटखा मिळुन आल्याने अन्न व औषधी प्रशासन विभाग जालना यांना लेखी पत्र देऊन माहीती दिली असता प्रशांत अजिंठेकर अन्न व औषधी प्रशासन विभाग जालना यांच्या तक्रारीवरुन आरोपी नामे इसम १. सरफोद्यीन शेख जैनुद्यीन वय – 35 वर्ष रा. रास्तीपुरा शहीदाबागा दर्गाजवळ बुन्हाणपुर राज्य मध्यप्रदेश 2. शेख नदीम शेख नफीस वय 27 वर्ष रा.आंबेडकर वार्ड गौरीशंकर मंदीर बुऱ्हाणपुर राज्य मध्यप्रदेश 3. फिरोजखान मेहमुद खान रा.भोकरदन ता. भोकरदन जि. जालना यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक श्री. सागर शिंदे, हे करीत आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपाणी, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. नितीन कटेकर पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उप-निरीक्षक श्री. सागर शिंदे, पो.अ.योगेश गवळी, शरद शिंदे, पो.अ. सतिष दोडके, गणेश पिंपळकर यांनी केली आहे


























