धाराशीव – जिल्हा परिषद शाळा गोजवाडा येथे वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक घुले सर अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून जाणीव संघटना वंचित विकास संस्थेचे रामभाऊ लगाडे यावेळी कार्यक्रमाची प्रस्ताविक बळीराम जगताप यांनी केले.
ते म्हणाले धर्मासाठी व राष्ट्रासाठी शहीद फत्तेसिंग शहीद जोरासिंग यांनी बलिदान धर्मासाठी व राष्ट्रासाठी दिले यावेळी शीख धर्माच्या कामगिरी बाबत त्यांनी आपले विचार मांडले यानंतर जाणीव संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी वीर बाल दिवसाच्या निमित्त मुलांना मार्गदर्शन केले व्यक्तिमत्व विकास संवाद कौशल्य नेतृत्व कौशल्य यावर मार्गदर्शन केले.
यानंतर मुला मुलींचा अभिरुची वर्ग घेऊन खेळ गाणी गोष्टी शिकवल्या या कार्यक्रमाला भारत काशीद अस्वले नामदेव कावळे सर इत्यादींनी परिश्रम घेतले यावेळी शंभर ते दीडशे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

























