सोनखेड / नांदेड – सोनखेड ते लोहा महामार्गांवर आंबेसांगवी पाटीजवळ एक भरधाव कार क्रमांक एम एच 26 ए के 6444 दुभाजकावर आदळल्याने गाडीने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.
सदरील घटना आंबेसांगी पेट्रोल पंप जवळ ची घटना आहे घटनेची माहिती समजताच सोनखेड पोलीस घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गाडीतील चालक पूर्ण पणे जळून गेला होता.
गाडीच्या नंबर वरून मयत याची ओळख पटली असून मयताचे नाव शेषराव किशनराव लिंगनवार असून तो दक्षिणमुखी हनुमान मंदिर,मगनपुरा नांदेड येथील रहिवाशी आहे काही लोकांनी गाडीचा स्फ़ोट होऊन गाडीने पेट घेतला असे सांगितल्यावर सोनखेड पोलीस ठाण्याचे सपोनि पांडुरंग माने यांनी घटनेचा सर्व बाजूने तपास सुरु असल्याचे सांगितले गाडीने कसा पेट घेतला याचे कारण अद्याप समजले नसल्याचे सांगितल्या जात आहे

























