अक्कलकोट – देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आण्विक धोरणाचा पुरस्कार करून पोखरण येथे अणु चाचण्या केल्याने देशाला अणुशक्ती राष्ट्राचा दर्जा मिळाला. त्यांनी पायाभूत सुविधा विकासास चालना दिल्यामुळे देशाची प्रगती झाली. म्हणूनच ते देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मानले जातात असे प्रतिपादन मल्लिकार्जुन मसुती यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाने आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, विभाग प्रमुख प्रा डॉ शितल झिंगाडे- भस्मे, प्रा शिल्पा धुमशेट्टी, प्रा जनाबाई चौधरी, विद्याश्री वाले, मधुबाला लोणारी, प्राची गणाचारी, प्रा राजशेखर पवार, डॉ बाळासाहेब पाटील, सौरभ भस्मे, ओंकार घिवारे उपस्थित होते.
पुढे बोलताना मसूती म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी लाहोर बस सेवा सुरू करून शेजारील देशाशी संवाद वाढवला. सुवर्ण चतुर्भुज महामार्ग योजना कार्यान्वित करून राष्ट्रीय महामार्गाचे जाळे मजबूत केले. सुशासन देशातील नागरिकांसाठी हितकारक असते अशी त्यांची विचारधारा होती. त्यांनी नेहमी सहमतीचे राजकारण केले, त्यामुळे त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक विभाग प्रमुख प्रा डॉ शितल झिंगाडे- भस्मे यांनी केले, आभार प्रा सौरभ भस्मे यांनी मानले.
राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, ज्युनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी इंग्लिश विभाग प्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी अभिनंदन केले.
पंडित मदन मोहन मालवीय यांच्या १६४ जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आला. यावेळी मल्लिकार्जुन मसुती याच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मल्लिकार्जुन मसुती व मान्यवर


























