सोलापूर – शहर परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास लष्कर मुर्गीनाला परिसरात राहणाऱ्या आयुब सय्यद वय वर्ष 50 या तृतीयपंथीचा मृतदेह घरात आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता, घटनास्थळी सदर बाजार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पथकासह दाखल झाले.
मध्यरात्री सोलापुरातील लष्कर भागातील मुर्गी नाला परिसरात गंभीर घटनेची नोंद झाली. एमआयएम पक्षातील प्रभाग क्रमांक 16 चा इच्छुक नगरसेवक उमेदवार आयुब सय्यद यांचा अज्ञातांनी खून केला. ही घटना मस्जिद जवळ घडल्याचे सांगितले जात आहे. यांची एका पक्षाकडून उमेदवारीसाठी तयारी चालू होती. त्यांचे बॅनर प्रभागात लावले जात होते, मात्र अचानक झालेल्या या खुनामुळे परिसरात भय आणि चिंता पसरली आहे.
“तृतीयपंथी आयुबच्या घराचे दार उघडले असता, पोलिसांना आयुब हा बेडवर निपचित झोपल्याचे दिसून आले. त्यांच्या तोंडावर उशी होती व त्या उशिनेच कदाचित तृतीयपंथीय आयुब यांचा खून झाल्याच संशय नातेविकांकडुन होत आहे. आयुबच्या तोंडावर उशीर होती. घराशेजारी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्या सीसीटीव्ही कॅमेरात रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास आयुबच्या घरातून तिघे अज्ञात इसम बाहेर पडतानाचे दृश्य दिसून आले. इतकेच नव्हे तर हातात बॅग असल्याचे निदर्शनास येत आहे. डोक्यावर टोपी व पायात पांढरे बूट दिसून येतायत. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले असून त्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अज्ञात इसमाचे शोध घेत आहेत अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
तृतीयपंथी आयुब यांचा मृतदेह शवेविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय पाठवण्यात आला. आयुब यांचा स्वभाव अगदी मनमिळावू होता, त्यांच्याकडे किलोभर सोनं होतं, पैसे होते, त्या हव्यास्या पोटी तृतीयपंथी आयुब यांचा खून झाल्याची कुजबुज नागरिकांमध्ये होतं होती. दरम्यान नेमका खून कोणी केला. सदर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी याप्रकरणी तपास करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, त्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.


























