Monday, November 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मदत गरजेची : कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे

तरुण भारतbyतरुण भारत
December 28, 2025
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आईवडिलांची सेवा देवपूजेपेक्षाही सर्वश्रेष्ठ असून  शिक्षणामुळे प्रगतीची दारी खुली होतात. त्यामुळेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मदत मिळणे गरजेचे असते. आईवडिलांची सेवा करण्याबरोबरच निराधार विद्यार्थ्यांचे शिक्षण करणे या पार्श्वभूमीवर मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याचा विचार कौतुकास्पद असून हा विचार आणखीन प्रभाविपणे प्रसारित झाला तर समाजातील गरजूंना मदतीचा हात मिळणार आहे. गुणवंतांना शिष्यवृत्ती वाटपाचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

        नामदेवराव भालशंकर यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नामदेवराव (बापू) बंडूजी भालशंकर गौरव समिती, मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन तसेच सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्यावतीने शिवस्मारक सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार आणि शिष्यवृत्ती तसेच संविधान गौरव परीक्षेतील गुणवंतांना पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अण्णासाहेब भालशंकर हे होते. यावेळी मंचकावर मातोश्री रुक्मिणी भालशंकर, प्रार्थना फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद मोहिते, शिक्षण विभाग वेतन व भ. नि.नि. पथकाचे जिल्हा अधीक्षक लक्ष्मण बालवाड, सागर अंबूरे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाचे सदस्य प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ, समता सैनिक दलाच्या जिओसी सुमित्रा जाधव, नानासाहेब भांलशंकर, गौरव समितीचे सचिव प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

          त्यानंतर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन रवी देवकर यांनी करून घेतल्यानंतर दिवंगत रुक्मिणी गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर 12 पुरस्कारार्थींना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच निराधार गरजू , दत्तक विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वितरण केल्यानंतर सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित केलेल्या संविधान गौरव परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना भरघोस रकमेचे धनादेश, पारितोषिके व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

        अध्यक्ष स्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले, “आपण प्रत्येकाने जन्मदाते आई-वडिलांची काळजी घेणे, सेवा करणे ही आपली नैतिक जबाबदारी असून, प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना शिक्षण देणे तितकेच आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी मुलांचे शिक्षण थांबू नये; कारण शिक्षणामुळेच पुढची पिढी घडते व समाज प्रगत होतो”.

 यावेळी प्रा. बापूसाहेब आडसूळ, सुमित्रा जाधव यांचेही मनोगत झाले. या समारंभाचे प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले. सूत्रसंचालन विक्री करनिरीक्षक बुद्धजय भालशंकर व प्रा. युवराज भोसले यांनी केले तर शिवाजी जगताप यांनी आभार मानले. याप्रसंगी चिमुकल्यांनी नामदेवराव भालशंकर यांच्या पूर्व आयुष्यावर आधारित नातवांनी वास्तववादी लघुनाटिका सादर केली. 

यांचा झाला पुरस्काराने  सन्मान 

 तथागत भगवान गौतम बुध्द धम्मरत्न पुरस्कार आनंद जाधव (सरचिटणीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती ॲन्टॉप हिल, मुंबई), डॉ. बाबासाहेब आंबेडकर  समतारत्न पुरस्कार चंदाताई कासले (लेफ्टनंट जनरल- समता सैनिक दल, मुंबई), राजर्षी शाहू महाराज जीवनगौरव पुरस्कार दिलीपराव चौगुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्काराने डॉ.  सुरेश कोरे , क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले समाजरत्न पुरस्कार  युवराज पवार , राजर्षी शाहू महाराज उद्योगरत्न पुरस्कार शंकर चौगुले , क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार- लाडजी बागवान , राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार मयुर प्रधान, राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार मनोहर कुंभार , डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार – विश्वभूषण लिमये (उपसंपादक-साम टि. व्ही. मराठी), राहुल भालशंकर, ( संपादक तेजस न्यूज महाराष्ट्र), तथागत भगवान गौतम बुध्द विशेष गौरव पुरस्कार- सम्यक विचार मंच-मिलिंद व्याख्यानमाला, सोलापूर या सत्कारमुर्तीचा सपत्नीक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ, शाल, वृक्षाचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला.

Post Views: 210
Previous Post

इच्छुक नगरसेवकाचा खून? परिसरात भीतीचे वातावरण

Next Post

सोलापूरकर सर्वाधिक जागा जिंकून आणतील – दत्तात्रय भरणे 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूरकर सर्वाधिक जागा जिंकून आणतील - दत्तात्रय भरणे 

ताज्या बातम्या

टॉवेल व्यापाऱ्याची 40 लाखाची फसवणूक -मुंबईच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

November 1, 2026
जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचवावा – सीईओं जैन 

जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचवावा – सीईओं जैन 

November 1, 2026
सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

November 1, 2026

जिल्ह्यातील ५० आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय मानांकन; आता शाळांच्या गुणवत्तावाढीचे आव्हान!

November 1, 2026

एमपीएससीच्या अनागोंदीत तरुणांचे भविष्य अडकले; वय, पैसा आणि मानसिक स्वास्थ्याचा कस!

November 1, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो तर्फे प्राचार्य वीरेश थळंगे यांना नेशन बिल्डर अवार्ड प्रदान

रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो तर्फे प्राचार्य वीरेश थळंगे यांना नेशन बिल्डर अवार्ड प्रदान

November 1, 2026

ऊस दरावरून राजू शेट्टी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन, कारखानदारांना दर जाहीर करण्याचे आवाहन !

November 1, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाके मुक्त दिवाळीची शपथ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाके मुक्त दिवाळीची शपथ

November 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1453778

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!