सोलापूर – आगामी महापालिका निवडणुकीत सोलापूरकर आमच्या पक्षाच्या सर्वाधिक जागा जिंकून आणतील असा विश्वास कृषी मंत्री तथा सोलापूरचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध पैलूंवर भाष्य केले. ते म्हणाले, आमचा पक्ष शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे युतीसाठी आम्ही प्रस्ताव दिलेला नाही. तिन्ही पक्षांची विचारधारा स्वतंत्र आहे. परंतु आम्ही तिघही एकत्रित येऊन आमच्या आमच्या पद्धतीने काम करत आहोत. युती करायची की नाही हा वरिष्ठ स्तरावरचा निर्णय आहे. यासंदर्भात मी बोलणे उचित ठरणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी शेवट दिवशी जाहीर करण्यात येईल. त्यांना तात्काळ एबी फॉर्म देण्यात येतील. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
सोलापुरात शनिवारी अनेक वर्षे काँग्रेस पक्षात आणि त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काम करत असलेल्या काँग्रेसचे माजी महापौर यु.एन. बेरिया व नलिनी चंदेले यांनी राष्ट्रवादी भवनात मंत्री व राष्ट्रवादीचे सोलापूरचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या विद्यमान नगरसेविका परवीन इनामदार, माजी नगरसेवक हारून शेख तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या संघटक मीनल दास यांनीसुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान जेष्ठ नेते सुधीर खरटमल,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे,ज्येष्ठ नेते तौफिक शेख ,चंद्रकांत दायमा ,आनंद मुस्तारे,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,वसिम बुऱ्हाण,मकबूल मोहोळकर ,माजी नगरसेविका पूनम गायकवाड ,माजी नगरसेविका तस्लिम शेख, चित्रा कदम ,सायरा शेख,प्रा. श्रीनिवास कोंडी ,जेष्ठ नेते हेमंत चौधरी ,शशिकांत कांबळे,बाबा सालार ,बसवराज बगले,खलील शेख ,अनिल उकरंडे ,अजित बनसोडे ,कलीम तुळजापुरे ,सुजित अवघडे ,साजिद पटेल ,ऍड.जयप्रकाश भंडारे,अमीर शेख ,बसवराज कोळी ,अनिल बनसोडे ,अल्मेहराज आबादीराजे, मार्तंड शिंगारे ,कुमार जंगडेकर ,संजय सांगळे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो ,एकच वादा अजित दादा या घोषनांनी राष्ट्रवादी परिसर दणाणून सोडला.
निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल
महापालिका निवडणुकीत इच्छुकांची भाऊ गर्दी पक्षामध्ये वाढत आहे. अशा परिस्थितीत निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला जात आहे. परंतु नवीन कार्यकर्त्यांना तात्काळ उमेदवारी देण्यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे नवीन आलेल्या उमेदवारांनी आपले तिकीट फिक्स समजू नये. निष्ठावंत कार्यकर्त्यांचा जरूर विचार केला जाईल. त्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यात येईल.


























