बार्शी – तालुक्यातील चुंब व परिसरातील सोपल गटाचे समर्थक, माजी सरपंच किशोर जाधवर यांनी बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
मा.आ. राजाभाऊ राऊत यांनी त्यांचे स्वागत करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बाजार समिती, नगरपालिका निवडणुकीतही सोपल गटाकडून भाजपामध्ये प्रवेश सुरु होते. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोपल गटातून प्रवेश होत आहेत.


























