सांगोला – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सांगोला येथील सतीश सावंत यांना प्रेस लाईव्ह मीडियाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून आज सोमवार दि.२९ डिसेंबर रोजी स.११ वा. सांगलीमध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी गेली ३० वर्ष उल्लेखनीय पत्रकारितेचे काम केले आहे.
पत्रकारांच्या अडीअडचणीसाठी पत्रकारांना मार्गदर्शन करून त्यांच्या अडीअडचणी सोडवत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सतीश सावंत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


























