सांगोला – भाजप सरकारच्या योजना तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहोचवून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले. ते जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात आयोजित भाजपच्या बैठकीत बोलत होते.
याप्रसंगी मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, संभाजी आलदर, दुर्योधन हिप्परकर, दादासाहेब खरात, भाऊसाहेब रुपनर, श्रीकांत देशमुख, सचिन देशमुख, बाळासाहेब काटकर, नंदकुमार दिघे, अनिल(बंडू) केदार, राजू मगर, बाळासाहेब झपके, वसंत सुपेकर, राजश्री नागणे, नवनाथ पवार, शिवाजीराव गायकवाड, एन.वाय.भोसले, उत्तम खांडेकर, पोपट गडदे, प्रशांत वलेकर, उल्हास धायगुडे, सुरेश चौगुले, प्रवीण चौगुले, डॉ.जयंत केदार, मधुकर पवार, मोहन मिसाळ, सुजाता केदार, वैशाली झपके, शोभा फुले, तनुजा एरंडे, स्वाती मगर, संगीता चौगुले, अनिता बेले, वैजयंती देशपांडे उपस्थित होते.
पुढे बोलताना चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ साधला पाहिजे. जुन्यांना विसरून चालणार नाही. नव्यांबरोबर जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागेल. तरच निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने ते यश मिळू शकेल. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून नागरिकांमध्ये सरकारप्रति आत्मीयता निर्माण करावी. जिल्ह्यात भाजपचा बालेकिल्ला कायम टिकवून ठेवत आगामी काळात पक्ष, संघटना आणखी मजबूत कसे करता येईल, यावर आपण काम करणार आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचा दौरा केला जाईल. प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुखांची बैठक घेतली जाईल. सदर निवडणुका भारतीय जनता पक्ष हा कमळ चिन्हावर लढवण्याचा निर्धार केला असून युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे हे घेतील.
– चेतनसिंह केदार सावंत, जिल्हाध्यक्ष, भाजप


























