राज्य शासनाने नुकतंच ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे राज्यगीत म्हणून घोषित केलं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून याची अमलबजावणीही सुरू होईल. हे गीत ऐकून नेहमीच अभिमानाने ऊर भरून येतो. मात्र आज चक्क काश्मिरी मुलींच्या ओठी हे गीत ऐकताना भारावून गेलो. ‘सरहद’ संस्थेतील जम्मू-काश्मीरमधील शहीद जवान आणि पोलीस बांधवांच्या मुलींच्या मुखातून हे गीत ऐकण्याचं भाग्य मला लाभलं. त्यांच्या तोंडून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा प्रत्येक शब्द ऐकताना अतिशय अभिमान वाटला. हीच आपल्या देशाची ताकद आहे. ‘विविधतेत एकता’ हे आपलं ब्रीद या निमित्ताने अधोरेखित झालं आणि ही एकता जपताना भाषेचं बंधन कधीही आडवं येत नाही, हे देखील स्पष्ट झालं.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...