डोंबिवलीमधील गोपाळ नगर येथील एका घराच्या बाल्कनीत दुर्मीळ घुबड आढळलं आलं.या घुबडाच्या मागे कावळे लागले होते, त्यामुळे तो बाल्कनीत आलं अशी तेथील राहिवाशांची माहिती आहे. त्यानंतर पक्षी मित्र निलेश यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर या घुबडाचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. यात त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. त्याला सुखरूप जंगलात सोडलं जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. हे घुबड लहान असून त्याच्या कानावर पिसं आहेत. त्याचा राखाडी रंग असून त्याचे डोळे पिवळ्या आणि काळ्या रंगाचे आहेत. साधारणपणे हे घुबड पंजाब, सिंध, महाराष्ट्र, पुणे, ठाणे, अहमदनगर आणि रत्नागिरी इथे आढळून येतं. डोंगरांचा खडकाळ भाग आणि उजाड प्रदेशात हे आढळतं. छोटे पक्षी, कीटक, उंदीर असं या घुबडाचं खाद्य आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...