टेंभुर्णी – मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ०६ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो. याच औचित्याने महामानव प्रतिष्ठानच्या वतीने टेंभुर्णी व परिसरातील पत्रकार बांधवांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात टेंभुर्णी प्रेस क्लब तसेच टेंभुर्णी शहर ग्रामीण पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष सतीश चांदगुडे, टेंभुर्णी शहर ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय भोसले, उपाध्यक्ष विष्णू बिचकुले, सचिव राजेंद्र केदार, खजिनदार अनिल जगताप यांचा सन्मान करण्यात आला. तसेच नव्याने नियुक्ती झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार डी. एस. गायकवाड, श्रीकांत मासुळे व महावीर वजाळे यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार सदाशिव पवार, संतोष वाघमारे, सोपान ढगे, संतोष पाटील, गणेश चौगुले, धनंजय मोरे, हरिश्चंद्र गाडेकर, सचिन होदाडे, सुरज देशमुख, नाथा सावंत, दत्तात्रय सुरवसे आदीं पत्रकारानसह बी. के. गायकवाड, परमेश्वर खरात, नितीन खरात, विजय कोकाटे, शेखर जगताप, रामभाऊ मिटकल, रंजीत गायकवाड, समीर नाईक नवरे, विजय गायकवाड, धनंजय कांबळे, सुनील पोळ, सौरभ शिंदे,आशिष लोंढे, अनिल सोनवणे, रोहन लोंढे, कशवेद दाजी,अविनाश धोत्रे आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन महामानव प्रतिष्ठानचे संस्थापकअध्यक्ष यशपाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पत्रकारितेतील योगदानाबद्दल पत्रकारांचा सन्मान करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा उद्देश या कार्यक्रमातून साध्य करण्यात आला.


















