सांगोला – आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, माढा येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत सांगोला महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने व्दितीय क्रमांक पटकावला. तसेच संघातील खेळाडू सानिका गायकवाड आणि श्रीराम शितल यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणाऱ्या क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी व पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार व प्रा.पी.सी.झपके, खजिनदार नागेश गुळमिरे, सचिव ऍड.उदयबापू घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे तसेच या संघास मार्गदर्शन करणारे प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले व क्रीडा शिक्षक प्रा.जगदीश चेडे यांनी संघाचे अभिनंदन केले.
कार्यकारिणी निमंत्रित सदस्य सुरेश फुले यांच्या हस्ते सदर खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्राध्यापक वर्ग, क्रीडा समिती सदस्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















