बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्यावतीने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा २०२५–२६ च्या उद्घाटन समारंभाचे आयोजन बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजच्या कर्मवीर क्रीडांगणावर उत्साहात पार पडले.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार श्री. दिलीपराव सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून बार्शी न. प. चे मुख्याधिकारी श्री. तैमूर मुलाणी, पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे, संस्थेचे खजिनदार जे. सी. शितोळे, सहसचिव ए. पी. देबडवार, सचिव पी. टी. पाटील, अध्यक्ष ्डॉ्ड्डॉ्ड डॉ. बी. वाय. यादव यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व मान्यवरांचा आयोजकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आमदार दिलीपराव सोपल यांनी आपल्या सांगितले की, कबड्डी हा ग्रामीण भागातील मातीतून जन्मलेला खेळ असून तो युवकांमध्ये शिस्त, संघभावना, धैर्य व जिद्द निर्माण करतो. अशा राज्यस्तरीय स्पर्धांमुळे खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळते.अध्यक्षीय भाषणात नंदन जगदाळे यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडाशिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती डमरे, प्रा. मोहिनी शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. किरण चपटे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. संजय करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रोहित डिसले (स्पर्धा सचिव) व श्रीमती रुपाली शिंदे (सहसचिव) यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
उद्घाटन समारंभास विविध महाविद्यालयांतील खेळाडू, क्रीडाप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे बार्शी शहराच्या क्रीडाक्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून स्पर्धेतील सामने अत्यंत चुरशीचे ठरणार असल्याचे मत उपस्थित क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले.

















