मोडनिंब – श्रीदत्त बहुउद्देशीय विकास मंडळ, अरण यांच्या वतीने मोडनिंब ( ता. माढा) येथे पत्रकार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. प्रारंभी मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आली.संजीवन विद्यालयाचे प्राचार्य रणदिवे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या शैक्षणिक, भौतिक व गुणवत्तात्मक प्रगतीचा आढावा घेतला.
पत्रकार हे समाजाचे आरसे असून समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करत असल्याचे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमास मोडनिंब प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रथमेश पवार,प्रकाश सुरवसे, विरेन कुलकर्णी, युवराज रणसिंग,राहुल चंदनकर बाबुराव जाधव, रमेश शिरसट, अभिषेक पवार ,विजयकुमार परबत तसेच पेपर विक्रेते बाळासाहेब गडधरे यांचा समावेश होता.या सर्व पत्रकारांचा श्रीदत्त बहुउद्देशीय विकास मंडळाच्या वतीने शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी निर्भीड, सत्यनिष्ठ व लोकाभिमुख पत्रकारितेची भूमिका अधोरेखित करण्यात आली.कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी कांबळे, उपाध्यक्ष मोह पावणे, सचिव प्रकाश इंगळे, संचालक नागनाथ काळे, कैलास तोडकरी, विलास जाधव यांच्यासह शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सुभाष रणदिवे, मुख्याध्यापक अमोल सरडे व सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित पत्रकारांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत सर्व पत्रकार बांधवांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका ससाणे यांनी केले तर आभार नीलकंठ पवार यांनी मानले. याचबरोबरच जिल्हा परिषद मुलीची शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालययात पत्रकार दिनानिमित्त उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या ठिकाणीही पत्रकारांच्या सामाजिक योगदानाबद्दल गौरव करण्यात येत निर्भीड व लोकहितासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
















