कुर्डूवाडी – नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्ष जयश्री भिसे यांनी आज आपला पदभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्यानिमित्त त्या शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व नगरसेवकांसह वाजत गाजत नगरपरिषदेपर्यंत आल्या, यावेळी प्रवेशद्वार ते के. एन.भिसे सभागृहापर्यंत फुलांच्या पायघड्या आणि रंगीबेरंगी फुगे लावून त्यांचे नगरपरिषदेत स्वागत करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी सचिन टीपासे व कार्यालय निरीक्षक बापू चोबे यांनी नगराध्यक्ष व नूतन नगरसेवकांचा स्वागत व सत्कार केला. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयजयकार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे ही उपस्थित होते,तर ठाकरे गटाच्या सेनेचे नूतन नगरसेवक ऋषिपाल वाल्मिकी यांची गटनेते म्हणून निवड डिकोळे यांनी जाहीर केली.तसेच शिवसेनेच्या या नगरसेवकांना अपक्ष नगरसेवक शकील तांबोळी यांनी पाठिंबा जाहीर केला.
यावेळी सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. विलास मेहता, फुलचंद धोका, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश कदम, राजेंद्र पारखे,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास,डॉ. जयंत करंदीकर,आदींची भाषणे होऊन नूतन नगराध्यक्षा जयश्री भिसे यांना शुभेच्छा देत शहरातील विकास कामाला लवकर प्रारंभ करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी नगराध्यक्ष या सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास करतील आणि आपल्याला तक्रारी करायला जागा ठेवणार नाही अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली
यावेळी नूतन नगरसेविका अंजली गावडे, सरस्वती क्षीरसागर, अबोली चौधरी, रेश्मा गोरे,संतोष भिसे,दिलीप गोडसे, यासीन बहामद,महेंद्र मेहता, सोमनाथ गवळी, साहिल भिसे, माणिक श्रीरामे,साक्षी डिकोळे आदींसह शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी सभागृह तुडुंब भरून गेले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कदम यांनी तर आभार साक्षी भिसे यांनी मानले
सेनेचे गटनेते ऋषिपाल वाल्मिकी यांनी धनंजय डिकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगरपालिकेत काम करणार आहोत,परंतु सभागृहात सुद्धा आम्हाला ते हवे आहेत अशी मागणी केली. तर अपक्ष उमेदवार अपक्ष नगरसेवक शकील तांबोळी यांनी पाठिंबा व्यक्त करताना मी लहानपणापासूनच शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, होतो आणि राहणार आहे असे सांगितले.

















