सोलापूर – राजमल नारायण बोंबड्यालशाळेचे सन 1996 – 97 सालच्या सातवीच्या विद्यार्थ्यांचा ‘स्नेहमेळावा’ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल २८ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने आणि दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील विविध अनुभव आणि आठवणी कथन केल्या. अनेक वर्षांनी एकमेकांना भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
याप्रसंगी शाळेतील त्या वेळच्या सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी नागराज लिगाडे व विशालक्षी श्रीराम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सत्यम गुंटूक यांनी मानले. या मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी उमेश पामूल, वासुदेव कोम्पेली, गणेश कस्तुरी, अरुण गाजूल, श्रीकांत कोंडा, विनोद कामुनी, वेणूगोपाल दोरणाल, अनिल चिप्पा, अंकुश गदगे, नंदकिशोर गणापुरम, गोविंद उसकेमुरी, हरिदास महेशश्र्वरम, सुनिता इट्टम, वैशाली साखरे, अरुणा फुलपाटी व इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

















