सोलापूर : स्वराज्य माहिती अधिकार संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात 21 पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्यचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दै. सांजचे संपादक अविनाश कुलकर्णी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत स्वराज्यचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी केले. स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे, संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे, विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा धनश्री उत्पात यांच्या सूचनेनुसार व विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख उमेश काशीकर, सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांच्या नेतृत्वाखाली वरील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सरचिटणीस सागर सुरवसे, नंदकुमार येच्चे, अजित उब्रजकर, विक्रांत कालेकर, प्रितम पंडित, विकास कस्तुरे, नागेश चिप्पा, आफताब शेख, श्रीनिवास नक्का, मकरंद ढोबळे, संतोष धोत्रे, वसीम अत्तार, रविराज फुटाणे, यासिन शेख, मुजुब इनामदार, अय्युब कागदी, अक्षय बाबलाद आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वराज्यचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पंडित, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रकुमार रघोजी, जिल्हा सचिव सुधाकर शहाणे, जिल्हा सरचिटणीस दिपक कुरुलकर, मोडनिंब शहर कार्यकारणी सदस्य अमर शिंदे, वैकुठ जडल, संतोष पोतदार यांच्या हस्ते मान्यवर पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

















