मुंबई : हॅबिल्ड या भारतातील पहिल्या उत्तम सवय अंगिकारण्यास साह्य करणाऱ्या प्लॅटफॉर्मने आपला प्रमुख उपक्रम ‘हर घर योग’च्या लाँचची घोषणा केली आहे, जेथे व्यक्तींना २१-दिवस मोफत योग प्रवासाच्या माध्यमातून दररोज योग करण्याची सवय अंगिकारत वर्षाची सुरूवात आरोग्यदायी करण्यास प्रेरित करण्यात येणार आहे.
लहान, वारंवार केल्या जाणाऱ्या कृतींमधून आरोग्यदायी सवयी निर्माण होतात या विश्वासावर आधारित उपक्रम ‘हर घर योग’ सर्व वयोगटातील, लिंग व भौगोलिक क्षेत्रांमधील व्यक्तींना कोणत्याही दबावाशिवाय, परिपूर्णपणे त्यांचा योग प्रवास सुरू करण्यास किंवा पुन्हा सुरू करण्यास प्रेरित करतो, ज्यासाठी महागड्या सेटअपची गरज नाही.
आयआयटीचे माजी विद्यार्थी, सरकार-प्रमाणित योग तज्ञ आणि हॅबिल्डचे सह-संस्थापक सौरभ बोथरा यांच्या नेतृत्वांतर्गत हा उपक्रम निदर्शनास आणतो की, आरोग्यासंदर्भात अर्थपूर्ण परिवर्तन दररोज लहान, पण वारंवार केल्या जाणाऱ्या कृतींसह सुरू होते.
श्री. सौरभ बोथरा यांनी सांगितले की, ”बहुतेक व्यक्ती आरोग्यासंदर्भात मोठे संकल्प करत नववर्षाची सुरूवात करतात, पण त्यांचे पालन करणे आव्हानात्मक होऊन जाते. हर घर योग उपक्रमासह आम्ही आरोग्याची काळजी घेणे सोपे करत आहोत. योगा करताना कोणतीही भिती किंवा वेळ वाया जात असल्यासारखे वाटले नाही पाहिजे. आमचा २१-दिवसाचा मोफत प्रवास व्यक्तींना दररोज लहान स्वरूपातील योगामधून देखील दीर्घकालीन परिवर्तन घडून येऊ शकते, याचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. या उपक्रमाचा प्रत्येक कुटुंबाला पुढाकार घेत दररोज आरोग्यदायी सवय अंगिकारण्यास मदत करण्याचा मनसुबा आहे.”
या उपक्रमामध्ये लाखो व्यक्तींनी सहभाग घेण्यासह हॅबिल्डने जागतिक स्तरावरील जीवनातील सर्व स्तरांमधील लोकांना आरोग्याची काळजी घेण्यास प्रेरित करण्याचे आपले मिशन सुरू ठेवले आहे. हर घर योग उपक्रम डिजिटल-केंद्रित, मोठ्या प्रमाणातील उपक्रम म्हणून डिझाइन करण्यात आला आहे, जो व्यक्तींना एक वेळचा संकल्प किंवा कधीतरी करण्यात येणारा ऐवजी त्यांच्या दैनंदिन नित्यक्रमामध्ये योगचा समावेश करण्यास मदत करतो.
पारंपारिक फिटनेस आव्हानांच्या तुलनेत हर घर योग उपक्रम फक्त व्यायाम म्हणून नाही तर मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी दररोज योग करण्यास प्रेरित करतो. या उपक्रमाची खासियत म्हणजे यूट्यूबवर दररोज लाइव्ह, ऑनलाइन योग सत्रे प्रसारित केली जातात, ज्यामधून योग करण्यासंदर्भात मार्गदर्शन मिळते, तसेच सहभागींमध्ये सातत्यता आणण्यास आणि त्यांच्या दैनंदिन नित्यक्रमामध्ये योगाचा समावेश करण्यास मदत होते.
हर घर योग उपक्रमाचा मुख्य आधारस्तंभ समुदाय आहे. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, जेथे जून २०२५ मध्ये ३५ लाखांहून अधिक सहभागींनी नोंद केली. सहभागी एकत्र योग सराव करतात, प्रगती शेअर करतात आणि सहयोगात्मक कृतीसह वैयक्तिक प्रयत्नांच्या माध्यमातून एकमेकांना प्रेरित करतात.
व्हॉट्सअॅप व यूट्यूब अशा प्रचलित प्लॅटफॉर्म्सचा फायदा घेत हॅबिल्डने खात्री घेतली आहे की, हा उपक्रम तंत्रज्ञानप्रेमी नसलेल्यांसाठी देखील उपलब्ध असेल, ज्यासह आरोग्यदायी सवयी अंगिकारण्यासाठी गुंतागुंतीच्या साधनांची गरज भासत नाही, ही संकल्पना अधिक प्रबळ होत आहे.

















