सोलापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया, मतमोजणीसाठीची तयारी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या वतीने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.राज्य निवडणूक आयोगाने सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूकपूर्व तयारीबाबत समाधान व्यक्त केले.
या बैठकीस महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि पोलीस आयुक्त एम. राजकुमार सहभागी झाले होते. डॉ. ओम्बासे यांनी मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबत, ईव्हीएम मशीनची सुरक्षित साठवणूक, वितरण व्यवस्था, मतदान केंद्रांवरील सोयी-सुविधा तसेच मतमोजणी केंद्रांचे नियोजन याची सविस्तर माहिती पीपीटी सादरीकरणाद्वारे राज्य निवडणूक आयोगास दिली. सर्व व्यवस्था आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पारदर्शक व सुरक्षित पद्धतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य निवडणूक आयोगाने सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूकपूर्व तयारीबाबत समाधान व्यक्त करत आवश्यक सूचना दिल्या असून, निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूकपूर्व तयारीबाबत समाधान व्यक्त करत आवश्यक त्या सूचना दिल्या. आगामी निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश आयोगामार्फत देण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखा अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर, उपजिल्हाधिकारी, रो.ह.यो अंजली मरोड, उपजिल्हाधिकारी, अभिषेक देशमुख, उपविभागीय अधिकारी सोलापूर सदाशिव पडदुणे, उपविभागीय अधिकारी, भैरप्पा माळी, उपविभागीय अधिकारी, विजया पांगारकर,उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी, जयश्री आव्हाड, सहायक आयुक्त गिरीष पंडित, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यासह अधिकारी उपस्थिती होते.
यात्रा काळात अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी : एम. राजकुमार
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी मतदान व मतमोजणीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, संवेदनशील व अतिसंवेदनशील भागांतील पोलीस बंदोबस्त, गस्त, नियंत्रण कक्ष व आपत्कालीन व्यवस्थापनाची माहिती दिली. निवडणूक कालावधीत श्री सिद्धरामेश्वर यात्रा असल्याने भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून, या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मंजूर करण्याची मागणी पोलिस महासंचालकांकडे केल्याचे त्यांनी आयोगास कळविले.

















