सोलापूर : सोलापूर सोशल असोसिएशन उर्दू हायस्कूलमधील ज्येष्ठ शिक्षक रसूल चौधरी यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रसूल चौधरी हे शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आहेत संस्थेचे अध्यक्ष डॉ. अखलाक अहमद वडवान यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे विश्वस्त हाजी दाऊद मंगलगिरी, अशपाक अहमद सातखेड, प्रायमरीचे मुख्याध्यापक डॉ. आसिफ इक्बाल, उपमुख्यद्यापक इम्तियाज शाब्दि, पर्यवेक्षक अल्ताफ कुमठे, परिवेक्षिका यास्मिन खैरदी, संचालक सरफराज पठाण व इतर शिक्षक उपस्थित होते.
प्रभारी मुख्याध्यापक रिजवान शेख यांनी चौधरी सरांना पदभार दिला. सर्वांनी रसूल चौधरी यांना मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्यामुळे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .


















