सोलापूर – साखर पेठ येथील बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिंगुलांबिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी कु. ऋतुजा वीरेंद्र वेदपाठकने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल पटकाविले आहे.
राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, सोलापूर येथे आयोजित जे.के.एस. सोलापूर डिस्ट्रिक्ट कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा वीरेंद्र वेदपाठक हिने गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री बापू ढगे यांच्याकडून तिचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री प्रमोद हंचाटे, माध्यमिकचे मुख्याध्यापक गोपी नवले, पर्यवेक्षक शंकरगिरी गिरी व पालक उपस्थित होते.























