सोलापूर – महापालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार निर्मला हरीश जंगम, भारतसिंग विठ्ठलसिंग बडरुवाले, जुगनबाई शमशेरसिंग आंबेवाले, रवी शंकरसिंग कय्यावाले संपूर्ण पॅनलला लष्कर भागातील प्रसिद्ध मानाचा गणपती जय तिरुपती क्रीडा सेवा महामंडळाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आल्याने भाजपचा उमेदवारात आणि प्रभागात उत्सवाचे वातावरण पसरले.
दरम्यान, नळबाजार चौकातील बालाजी मंदिरात या पाठिंबाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तुळजाराम खंडेवाले, उपाध्यक्ष रामसिंग बिलोरेवाले, सचिव अशोक बोके वाले, काळूराम लगे वाले, तुळजाराम बलराम वाले, बळीराम बॉम्बे वाले, विक्रम सिंग हजारी वाले, जालिंदर मनसावाले आदींसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रभाग १७ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या रॅलीला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते. यावेळी लाडक्या बहिणींनी उपस्थिती दर्शवून पाठबळाचे आश्वासन दिले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे शहरात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना होणार असल्याने त्यांच्यामध्ये उत्साही वातावरण दिसून आले. विकासाच्या मुद्द्यावर आणि सोलापूरच्या मूलभूत गरजांवर तसेच आयटी पार्क पाणी प्रश्न सोडवणार असल्याचा आश्वासन दिल्याने भाजपाच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीनुसार श्री जांबमुनी मोची समाज भवनासाठी सोलापुरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी २ कोटी रुपयांचा भरघोस निधी भर सभेत जाहीर केल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे श्री जांबमुनी मोची समाजाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांचे समाज बांधवांनी आभार मानले.
















