माळशिरस – विदर्भ व महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघाने ४४ व्या सिनियर शुटींग बॉल चॅम्पियन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
येथील जिल्हा परिषद क्रीडांगणावर ४४ व्या सिनियर शुटींग बॉल चॅम्पियन स्पर्धेचे थाटात उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी जि. प. सदस्य शितलदेवी मोहिते पाटील, एशियन शुटींग बॉल फेडरेशन जनरल सेक्रेटरी रवींद्रसिंग तोमर, खजिनदार जे पी.कादियान, कार्यकारी सदस्य डो ओ पी.माचरा, शुटींग बॉल फेडरेशन ऑफ इंडिया जनरल सेक्रेटरी जीतराज तोमर , खजिनदार जितेन बघेल यांच्यासह तुकाराम देशमुख, कार्यकारी सदस्य रणजित काळे,किरण सावंत,अस्लम मुजावर ,विपिन ननवरे,आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत २५ राज्यातील पुरुषांचे व महिलांचे संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये भारताच्या संघाचे कर्णधार सुरेशकुमार बिष्णोई, जशविंदरसिंग जज (पंजाब), मित्तल नागर (उत्तराखंड), जितेंद्र बघेल (मध्यप्रदेश,सोहेब जामनेर, बखर अंजुम, सुशांत पवार (महाराष्ट्र), मोनिकासिंग (राजस्थान ) मुस्कान तनवी हे नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून टेक्निकल चेअरमन रणजित बिष्णोई(मध्यप्रदेश),अतुल तोमर (उत्तरप्रदेश),जाकीर खान (मध्यप्रदेश )सुनिल गावडे,(गोवा),प्रशांत पवार (महारष्ट्र ) सदेमअली (उत्तराखंड)हे काम पाहत आहेत.
——
महाराष्ट्रात ३० वर्षांनी स्पर्धा
१९९५ मध्ये गोरेगाव येथे सिनियर शुटींग बॉल चॅम्पियन स्पर्धा झाल्या होत्या. त्यानंतर ३० वर्षांनी महाराष्ट्रात ही स्पर्धा होत असून माळशिरस येथे होत असून माळशिरसच्या शुटींग बॉल प्रेमी साठी मेजवानी आहे.

















